आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ISIS च्या क्रौर्याचा नवा VIDEO, अफगाणिस्तानच्या सैनिकाचे शीर कापले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रक्का - ISIS या दहशतवादी संघटनेने शीर कलम करण्याचा नवा व्हिडीओ जारी केला आहे. 10 मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये एक दहशतवादी अफगामिस्तानच्या एका दहशतवाद्याचे शीर कापत असल्याचे दाखवण्यात आले आहे. हे फुटेज खुरासन प्रांतातील ISIS च्या एका संलग्न संस्थेने रेकॉर्ड केल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये ग्रुप कमांडर इस्लामिक मुव्हमेंट ऑफ उझबेकिस्तानबद्दलच्या निष्ठेविषयी बोलत असल्याचे दिसते. या ग्रुपने गेल्या महिन्यातच ISIS बद्दल निष्ठा व्यक्त केली होती.

व्हिडीओमध्ये काय?
व्हिडीओच्या सुरुवातीला अनेक फायटर्सचे मार्च दाखवण्यात आले आहे. त्यांच्या हातात बंदूक आणि ISIS चे बॅनर दाखवण्यात आले आहेत. त्यानंतर एक दहशतवादी तलवारीला धार करताना दिसतो. तसेच बंदी ऑरेंज जंपसूटमध्ये दहशतवाद्यांच्या समोर गुडघ्यावर उभा असल्याचे दिसते. शीर कापण्यापूर्वी त्या बंदीला कॅमेऱ्यासमोर बोलायला लावले. त्यानंतर दहशतवाद्याने व्हिडीओमध्ये दाखवलेला बंदी हा अफगान सेक्युरिटी फोर्सचा सदस्य असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर काळ्या कपड्यातील दहशतवादी या बंदीचे शीर कापताना दाखवण्यात आले आहे.

बंदीची ओळख पटेना
व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या बंदीची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच त्याचे शीर का कापण्यात आले त्या कारणांचा खुलासाही करण्यात आलेला नाही. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमरून यांनी सिरियात IS च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे जाहीर केले. त्यानंतर हा व्हिडीओ जारी करण्यात आला. ठार केलेल्या तिघांपैकी या दहशतवाद्यांपैकी दोघे ब्रिटनचे होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेचे संबंधित PHOTOS