आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ISIS ने निष्‍पाप मुलांसमोर 6 सीरियन सैनिकांचे केले शिरच्छेद...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रक्का -दहशतवादी संघटना आयएसआयएसने सोशल मीडियावर भयावह अशी नवी छायाचित्रे प्रसिध्‍द केली आहेत. त्यात एक बुरखाधारी दहशतवादी खुले आम सहा लोकांचे शिरच्छेद करताना दिसत आहे.आयएसआयएसने दिलेल्या माहितीनुसार ती सर्व सीरियन सैनिक होते. जे राष्‍ट्रपती बशर अल असद करिता लढत होते.
सैनिकांनी कार बॉम्बस्फोट घडवून आणून अनेकांचा जीव घेतला आहे.यामुळे त्यांची हत्या करण्‍यात आली आहे ,असे दहशतवाद्यांनी सांगितले.ही निर्दयी घटना सीरियन शहर अल मयादिनमध्‍ये घडली.हे शहर इस्लामिक स्टेटच्या नियंत्रणाखाली आहे.छायाचित्रांमध्‍ये दिसते, की आयएसने आपल्या समर्थकांना पाहावयास प्रवृत्त केले होते.गर्दीत मुलांचाही समावेश होता.दहशतवाद्यांनी सर्व ओलिस सैनिकांना कवायती करावयास लावले. नंतर लाकडाच्या एका प्लॅटफॉर्मजवळ घेऊन एका-एकाचा शिरच्‍छेद करण्‍यात आला. तत्पूर्वी दहशतवाद्यांचे कमांडरने अ‍रबी भाषेत मृत्यूदंडाचा आदेश देताना म्हटले, जो कोणी मुस्लिमांचे रक्त सांडेल, त्याला अशाच प्रकारच्या परिणामाला सामोरे जावे लागेल.लंडन येथील मिडल ईस्‍ट फोरमचे संशोधक अयमन जवाद अल तामिमी यांनी अरबीचे इंग्रजीत भाषांतर केले.
अल मयादिन शहरात आयएसआयएसने भरतीचे कार्यालय सुरु केले आहे.सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन रायट्सनुसार,2015च्या जानेवारी ते मार्च 23 पर्यंत आयएसआयएसने आतापर्यंत 400 लोकांची नव्याने भरती केली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, दहशतवाद्यांनी प्रसिध्‍द केलेले फोटोज...