त्रिपोली - सीरिया, लीबिया आणि इराकमध्ये पाय पसरवलेली दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (आयएस) आता लहान मुलांना शिरच्छेद करण्याचे प्रशिक्षण देत आहे. लीबियाच्या डेर्ना शहरात दहशतवाद्यांनी एका सैनिकाचा शिरच्छेद केला. तेव्हा त्या गर्दीत काही लहान मुले देखील होती. दहशतवाद्यांनी त्यांना डोके धडावेगळे कसे करायचे याची पद्धत समजावून सांगितली. या लहान मुलांचे वय साधारण आठ वर्षांपर्यंत होते. दहशतवद्यांनी मुलांसमोर सैनिकाला शिक्षा देण्याचे कारण स्पष्ट करताना सांगितले, की मुलांनाही शिरच्छेद कसा करतात हे कळाले पाहिजे. तो म्हणाला, मुलांना हे भयावह दृष्य पाहाण्याची परवानगी देण्यात आली होती.
आयएसचा लोकल टेरर सेल 'विलायत बार्का' ने वरील छायाचित्र जारी केले आहे. डेर्ना शहरावर आयएसने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ताबा मिळवला होता.
डेर्ना शहरातील मशिदीबाहर आयएसने लीबिया सरकारच्या सैनिकाला काफिर ठरवून त्याचा शिरच्छेद केला. शिक्षा देत असताना त्याला नारंगी रंगाचा जम्पसुट घालण्यात आला होता. या सैनिकाचे नाव अब्दुलनबी शुरागावी होती. त्याने टोब्रुक येथे आयएसच्या दहशतवाद्यांसोबत जोरदार लढत दिली होती. गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी त्याला पकडले होते. एका छायाचित्रात मशिदीच्या मुख्य द्वाराजवळ चेहऱ्यावर काळे मास्क चढवून दहशतवादी उभे होते. शुरगावीला टोंगळ्यावर बसवण्यात आले आणि त्याचे हात मागे बांधण्यात आले होते. एका छायाचित्रात दहशतवादी कापलेले शिर हातात घेऊन ते लहान मुलांना दाखवत आहे. हे दृष्य पाहिल्यानंतर लहान मुलांच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव नव्हते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशीसंबंधीत छायाचित्रे