आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Blow Up Boy While Teaching Militants How To Use Explosives

दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यासाठी ISIS ने चिमुरड्याला बॉम्बने उडवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
File Photo: सोशल मीडियावर दहशतवाद्यांनी शेअर केलेला एका बाळाचा फोटो. - Divya Marathi
File Photo: सोशल मीडियावर दहशतवाद्यांनी शेअर केलेला एका बाळाचा फोटो.
बेरूत - ISIS ने त्यांच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एका अनाथ मुलाला शरिरावर बॉम्ब बांधून उडवून देत थरकाप उडवून दिला आहे. ही घटना उत्तर इराकच्या सलाहुद्दीन प्रांतातील एका दहशतवादी प्रशिक्षण कॅम्पमधील आहे. इराकच्या माध्यमातील वृत्तानुसार या मुलाचे वय 5 ते 10 वर्षांदरम्यान असल्याचे सांगितले जात आहे.

दियाला प्रांतातील सेक्युरिटी कमिटीचे प्रमुख सादिक अल-हुसेनीच्या मते दहशतवाद्यांना 'बूबी ट्रॅपिंग मॅकेनिझम' बाबत शिकवले जात आहे. त्याने सांगितले की, ISIS दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या आरोपात या मुलाच्या वडिलांची हत्या करण्यात आली होती. तसेच त्याची आई जिवंत आहे किंवा नाही, याबाबतही काहीही माहिती नाही. वडिलांनी दहशतवाद्यांवर हल्ला केल्याची शिक्षा या मुलाला देण्यात आली. त्याला ट्रेनिंग कॅम्पमध्ये आणून त्याच्या शरिरावर स्फोटके बांधून उडवण्यात आले.

संघटनेतील ट्रेनरने दहशतवाद्यांसमोर या लहान मुलाच्या शरिरावर स्फोटके बांधली त्यांनंतर रिमोट कंट्रोल आणि डिटोनेटवरच्या मदतीने त्याचा स्फोट घडवून आणला. ट्रेनर दहशतवाद्यांना IID (इम्प्रुवाइज्ड एक्सप्लोसिव डिव्हाइस) असेंबल करणे शिकवत होता.