आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: आत्मघातकी हल्ल्याने तुर्कस्तान हादरले, 27 ठार तर 100 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंकारा- तुर्कस्तानमधील सुरुच शहरात झालेल्या आत्मघातकी हल्लात 27 जणांचा मृत्यू झाला असून 100 लोक जखमी झाले आहेत. सीरियाच्या सीमेवर असलेल्या कुर्द बहुल कोबानी शहराजवळ सुरुच आहे. कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. दरम्यान, ISIS वर संशय व्यक्त केला जात आहे.
कल्चरल सेंटरमध्ये होते 300 लोक
तुर्कस्तानच्या गृहमंत्रालयाने सांगितले आहे, की शहरातील एक कल्चर सेंटरच्या गार्डनमध्ये हा आत्मघातकी हल्ला झाला. सुमारे 300 युवक या ठिकाणी जमले होते. कोबानीतील पूर्ननिर्माण कार्यात भाग घेण्यासाठी हे तरुण आले होते. या हल्ल्यानंतरचे फोटो फेडरेशन ऑफ सोशलिस्ट यूथ एसोसिएशंसने शेअर केले आहेत.
कोबानीतून पळून सुरुचमध्ये आश्रय घेत आहेत लोक
सप्टेंबर 2014 पासून कोबानी शहरात ISIS दहशतवादी आणि कुर्द जवानांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. त्यामुळे या शहरातील नागरिक सुरुचमध्ये आश्रय घेत आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, आत्मघातकी स्फोटानंतरचे फोटो....
(EXTREME GRAPHIC CONTENT)
(सोर्स: ट्विटर)
बातम्या आणखी आहेत...