आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बकरी ईदच्या दिवशी इसिसने दिला नरबळी, उलटे लटकवून कत्तल, १२ मिनिटांचा व्हिडिआे जारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दमास्कस - इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने क्रौर्याच्या सर्व सीमा आेलांडल्या. बकरी ईदच्या दिवशी इसिसने १२ मिनिटांचा व्हिडिआे जारी केला. त्यात एका व्यक्तीला उलटे लटकवून त्याची हत्या केल्याचे दाखवण्यात आले आहे. ईदचा बळी दिल्याचे सांगण्यात आले आहे.

सिरियातील अज जोर भागात हा व्हिडिआे तयार करण्यात आला आहे. ‘द मेकिंग ऑव इल्यूशन’ असे नाव त्यास देण्यात आले आहे. त्यात २०१५ मध्ये झळकलेला टॉम क्रूझचा चित्रपट रॉग नेशनच्या काही क्लिपिंगही जोडण्यात आल्या आहेत. काही इतर चित्रपटातील हेरगिरीही दाखवण्यात आली आहे. परदेशातील हेरगिरी संस्थांची खिल्ली उडवण्यासाठी इसिसने हा व्हिडिआे तयार केला असावा, असे जाणकारांना वाटते.

व्हिडिआेमध्ये एक जल्लाद दो जणांना उचलून घेऊन जाताना दाखवण्यात आले आहे. काही लोकांना हुकाने उलटे लटकवण्यात आले आहे. नंतर जल्लाद त्यांचे गळे कापतो, असे दाखवण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...