आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Celebrating Recent Attack In Russia And France

ISISचा आनंदोत्सव, फोटोद्वारे सांगितले कसा ठेवला रशियन विमानात कॅन बॉम्ब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ISIS ने त्यांच्या मॅगझिनमध्ये केन आणि त्याबरोबर बॉम्बचा फोटो छापला आहे. रशियाच्या विमानात हाच बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे. - Divya Marathi
ISIS ने त्यांच्या मॅगझिनमध्ये केन आणि त्याबरोबर बॉम्बचा फोटो छापला आहे. रशियाच्या विमानात हाच बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे.
काहिरा - दहशतवादी संघटना ISIS रशियाचे पॅसेंजर प्लेन पाडल्याचा आणि पॅरिस हल्ल्याचा आनंदोत्सव साजरा करत आहे. त्यांनी त्यांच्या ऑनलाइन मैग्झिन दाकिबमध्ये रशियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. रशियाच्या विमानात कॅन बॉम्बद्वारे कशा पद्धतीने ब्लास्ट घडवून आणण्यात आला हे त्यांनी फोटोंद्वारे सांगितले आहे. 31 ऑक्टोबरला इजिप्तच्या शर्म अल शेखहून उड्डाण घेतल्याच्या 23 मिनिटांनंतर हे विमान क्रॅश झाले होते. या अपघातात 224 जण ठार झाले होते.

विमानात असा ठेवला बॉम्ब...
> IS ने हेही स्पष्ट केले आहे की, इजिप्तच्या विमानतळावर असलेली सुरक्षा भेदून विमानामध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता.
> ISIS ने म्हटले की, हा कॅन बॉम्ब फुटल्यामुळेच विमान क्रॅश झाले होते.
> त्यात सुमारे 1.5 किलो स्फोटके ठेवण्यात आली होती.

एक दिवसआधी काय म्हणाले पुतीन?
18 नोव्हेंबरला रशियाच्या फेडरल सेक्युरिटी सर्व्हीसचे डायरेक्टर अलेक्झेंडर बोर्टनिकोव्ह यांनी सांगितले की, विमानात बॉम्ब ठेवण्यात आला होता हे खरे आहे. त्यानंतर पुतीन यांनी त्या दहशतवाद्यांना शोधा आणि ठार करा असे आदेश दिले होते. दरम्यान, दहशतवाद्यांबाबत माहिती देणाऱ्यांना 50 मिलियन डॉलर (330 कोटी रुपये) चे बक्षीस देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

असे झाले प्लेन क्रॅश...
- 31 अॉक्टोबरला सकाळी 6.51 वाजता रशियाच्या एअरबस ए-321 फ्लाइट क्रमांक 7K9268 या विमानाने शर्म अल-शेखहून उड्डाण घेतले होते.
- दुपारी 12.10 च्या दरम्यान सेंट पीटर्सबर्गच्या पुलकोवो एअरपोर्टवर ते लँड होणार होते.
- त्यात सात क्रू मेंबर्स आणि 17 लहान मुलांसह 224 पॅसेंजर होते. एअरपोर्टहून उड्डाण घेतल्यानंतर 23 मिनटांनी विमान रडारहून गायब झाले होते.
- ते विमान रशियाच्या कोलेव्हिया एअरलाइन्सचे होते. विमानात बहुतांश प्रवाशी रशियन पर्यटक होते.
- रशियन मीडिया रिपोर्ट्सनुसार हा अपघात विमानातील तांत्रिक बिघाडामुळे झाला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS