नवी दिल्ली- ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया’ (इसिस) या अत्यंत क्रूर संघटना म्हणून ओळख असलेल्या दहशतवादी संघटनेचा सर्वेसर्वा अबू बकर अल बगदादी मारला गेल्याचा दावा इसिसशी संबंधित एका अरब वृत्तसंस्थेने केला आहे.‘अल अमक’ या वृत्तसंस्थेने हा दावा करताना म्हटले आहे की, रविवारी अमेरिकेसह मित्रराष्ट्रांच्या सैनिकांनी केलेल्या कारवाईत बगदादी गंभीर जखमी झाला होता. आता त्याचा मृत्यू झाला आहे. १२ जूनलाच बगदादीस लक्ष्य करून मित्रराष्ट्रांच्या विमानांनी जोरदार हवाई हल्ले केले होते. यात तो मारला गेला असल्याचे मानले जाते. सप्टेंबर २०१४ एिप्रल २०१५ मध्येही बगदादी मारला गेल्याचा दावा करण्यात आला होता.
इराक सिरियाच्या सीमेजवळ असलेल्या इसिसच्या मुख्यालयानजीक एका हल्ल्यात बगदादी जखमी झाला होता. त्याच्यासोबत काही दहशतवादीही जखमी झाले होते. या भागात बगदादीच्या उपस्थितीत एक बैठक सुरू असल्याचे कळाल्यानंतर मित्रराष्ट्रांच्या फौजांनी हवाई हल्ले केले होते.
एक कोटी डॉलर्सचे बक्षीस
बगदादी यास ठार मारण्यासाठी महत्त्वाची माहिती देणाऱ्यास कोटी अमेरिकी डॉलर बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर अनेकदा तो मारला गेल्याच्या बातम्या येत राहिल्या.
मणक्यावर सुरू होते अनेक दिवस उपचार
इसिसचा उदय झाल्यानंतर बगदादी ठार झाल्याच्या बातम्या अनेकदा आल्या. मात्र, त्याची पुष्टी होऊ शकलेली नाही. १८ मार्च २०१५ रोजी अशाच एका हल्ल्यात बगदादी गंभीर जखमी झाल्यानंतर त्याच्या मणक्यावर उपचार सुरू होते. या हल्ल्यात त्याचे तीन सहकारी मारले गेले होते. या हल्ल्यानंतर बगदादी अपंगच झाला होता.
फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला, ठार
पॅरिस- फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात एक पोलिस अधिकारी त्याची पत्नी मृत्युमुखी पडली. या दहशतवाद्याने दोघांनाही भोसकले होते. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईत हा दहशतवादीही मारला गेला.
या हल्ल्यानंतर पोलिसांना देशभर जोरदार शोधमोहीम सुरू केली असून हल्लेखोराची अद्याप ओळख पटलेली नाही. गेल्या नोव्हेंबर महिन्यात पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी संघटनेचे नाव घेत झालेला हा पहिलाच हल्ला आहे. फ्रान्समध्ये सध्या युरो कप फुटबॉल स्पर्धा सुरू असून देशभर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष होलांद यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.