आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US ने पहिल्यांदा भारतातील ISIS चा चीफ रिक्रूटरला घोषित केले ग्लोबल टेररिस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेने  स्पेशियली डेजिगनेटेड ग्लोबल टेररिस्ट (SDGT) या यादीत अरमरचे नाव समाविष्ट केले आहे. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
अमेरिकेने स्पेशियली डेजिगनेटेड ग्लोबल टेररिस्ट (SDGT) या यादीत अरमरचे नाव समाविष्ट केले आहे. (संग्रहित फोटो)
वॉशिंग्टन- अमेरिकेने भारत आणि त्याच्या शेजारील देशातील युवकांची ISIS मध्ये करणाऱ्या मोहम्मद शफी अरमर (30) ला जागतिक दहशतवादी घोषित केले आहे. अरमर हा भारताची निगडित ISIS चा असा पहिला दहशतवादी आहे ज्याच्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. 

कर्नाटकात राहणारा आहे अरमर

- अरमरचे नाव अमेरिकेने स्पेशियली डेजिगनेटेड ग्लोबल टेररिस्ट (SDGT) या यादीत टाकले आहे. तो कर्नाटकमधील भटकळ येथे राहणारा आहे.
- अरमरच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. तो छोटे मौला, अनजान भाई आणि यूसुफ अल-हिंदी या नावांनी ओळखला जातो.
- अरमरचे नाव अमेरिकेच्या ऑफिस ऑफ फॉरेन एसेट्स कंट्रोल ऑफ द यूएस ट्रेजरी डिपार्टमेंटच्या यादीतही सामील करण्यात आले आहे. यामुळे त्याच्या आर्थिक निर्बंध लादता येणार आहेत. बहुधा या यादीत अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांची नावे असतात. 

नेमका कोण आहे अरमर?

- अमेरिकेच्या माहितीनुसार अरमर हा भारतात ISIS मध्ये युवकांची भरती करणारा प्रमुख होता.
- त्याने ISIS चे अनेक हितचिंतक निर्माण केले. हे हितचिंतक भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी मदत करत.
- यूसुफ अल-हिंदी उर्फ अरमर हा भारतात इंडियन मुजाहिद्दीनवर कारवाई झाल्याने आपल्या मोठ्या भावासोबत पाकिस्तानात निघून गेला. 
- रियाज भटकळ आणि यासिन भटकळ यांच्यात भांडण झाल्यानंतर अरमर याने अंसार-उल-तौहिद ही संघटना बनवली. ही संघटना नंतर ISIS शी संलग्न झाली.  
बातम्या आणखी आहेत...