आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS च्या चाइल्ड सोल्जरने बिनधास्त मारली गोळी, जारी केला VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंधकाला गोळी घालताना ISIS चा लहान सदस्य. - Divya Marathi
बंधकाला गोळी घालताना ISIS चा लहान सदस्य.
तिकरित (इराक) - ISIS या दहशतवादी संघटनेने लहान मुलांकडून (चाइल्ड सोल्जर्स) बंधकांना गोळीने उडवल्याचा एक नवा व्हिडिओ जारी केला आहे. यात बंदी एका मुलासमोर गोळी मारू नये म्हणून विनंती करताना दिसत आहे. पण तो मुलगा त्याची जराही कीव न करता बिनधास्त त्याच्या डोक्यात गोळी घालतो. दहशतवादी बंदींना ओढत आणतात आणि मुलांना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यास सांगतात. विशेष म्हणजे ISIS या व्हिडिओद्वारे दहशतवाद्यांची नवी पिढी तयार करत असल्याचा संदेश जगभरात पसरवत आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, या नव्या व्हिडिओमध्ये 22 मिनिटांचे फुटेज आहे. त्यात इराकच्या लष्कराच्या सैनिकांना या मुलांकरवी गोळ्या घातल्याचे दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये लहान मुलगा किमान दोन गोळ्या घालतो. त्याने हातात पिस्तुल घेतले आहे. गोळी घातल्यानंतर मारलेल्या व्यक्तीचा मृतदेह नदीत फेकल्याचे दाखवण्यात आले आहे. नदीचे पाणीही रक्ताने लाल झालेले दिसते. हा व्हिडिओ गेल्यावर्षी इराकच्या तिकरितमध्ये तिगरिस नदीच्या किनाऱ्यावर चित्रित करण्यात आला होता. याच जागेवर ISIS ने 1700 नागरिकांचा एकाचवेळी संहार केला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
बातम्या आणखी आहेत...