आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISISच्या क्रूरतेची परिसीमा, दहशतवद्यांनी आईला खाऊ घातले तिच्याच मुलाचे मांस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोसूल - इराक आणि सीरियामधील अनेक प्रदेशांवर अंमल करत असलेली दहशतवादी संघटना आयएसआयएसने क्रूरतेची परिसीमा ओलांडली आहे. दहशतवाद्यांनी एका महिलेला तिच्या पोटच्या मुलाचे मांस खाण्यास भाग पाडले. दहशतवाद्यांनी तिच्या मुलाला बंदिवान बनवले होते आणि महिला दहशतवाद्यांच्या ठिकाण्यांवर जाऊन त्याच्या सुटकेची मागणी करत होती. आयएसआयएसविरुद्धच्या युद्धात इराकला गेलेल्या यासिर अब्दुल्ला या ब्रिटीश युवकाने या घटनेचा खुलासा केला आहे.
यासिरने 'द सन' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की दहशतवाद्यांनी एका कूर्द युवकाचे अपहरण करुन त्याला मोसूल येथे घेऊन गेले. त्यानंतर युवकाची वृद्ध आई मुलाचा शोध घेत आयएसआयएसच्या हेडकॉर्टरपर्यंत पोहोचली आणि तिने मुलाच्या सुटकेची भीक मागितली. तेव्हा दहशतवाद्यांनी तिच्या भावनांशी खेळत तिला धोक्यात ठेवून तिच्या मुलाचे शिजवलेले मांस खाऊ घातले.
यासिरने सांगितले, की ती वृद्ध माता मुलाच्या चिंतेने व्याकूळ झालेली होती. ती हेडक़र्टरला पोहोचली तेव्हा दहशतवाद्यांनी एवढ्या लांबून आलीस थोडा आराम कर असे तिला सांगितले. दहशतवाद्यांनी तिला म्हटले की, मुलाच्या भेटी आधी काही खाऊन घे. तिच्यासाठी चहा, शिजवलेले मांस, भात आणि सूप दिले. तिला जराही अंदाज नव्हता की, ती जे अन्न खात आहे ते मांस तिच्याच मुलाचे आहे. तिने खाऊन झाल्यावर दहशतवाद्यांना दुआ दिली. त्यानंतर तिने मुलाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा दहशतवादी क्रूरतेने हसले आणि म्हणाले थोड्यावेळापूर्वीच तू तुझ्या मुलाला खाल्लेस.
यासिरने सांगितले, की दहशतवाद्यांनी क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. ते बंदीवानांना ह्यूमन बोनफायरमध्ये जिवंत असतानाच टाकत आहेत. बंदिवानांना अत्यंत भयावह मृत्यू ते देत आहेत.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोण आहे यासिर अब्दुल्ला