आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS ने कापले हेराचे हात आणि पाय, Video केला जारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेरूत - ISIS या दहशतवादी संघटनेने त्यांचा नवा व्हिडिओ सादर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये बंदी बनवलेल्या एका हेराचे हात पाय कापताना दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओमध्येही बंदी असलेल्या हेराने नारंगी रंगाचा जंपसूट परिधान केल्याचे दाखवण्यात आले आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
ISIS चे दहशतवादी बंदी बनवलेल्या हेराची चौकशी करत असल्याचे या व्हिडिओमध्ये आहे. बंदी हेराने गुन्हा मान्य केल्याचेही यात दाखवण्यात आले आहे. चार मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये सुरुवातीला बंदी त्याचा गुन्हा मान्य करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. इराकचा हा व्यक्ती लष्कराचा गुप्तहेर होता आणि तो ISIS च्या विरोधात माहिती गोळा करत होता असा दहशतवाद्यांचा दावा आहे.

व्हिडिओमध्ये स्क्रीनवर काही लिहिलेले दाखवण्यात आले आहे. अल्लाह आणि त्याच्या संदेश वाहकांच्या विरोधात युद्ध पुकारणाऱ्यांना अशाचप्रकारे सुळावर लटकवून त्यांचे हात पाय कापले जातील, असे त्यात लिहिले होते. त्यानंतर वाळवंटात एका अज्ञात स्थळी बंदी लटकवलेल्या अवस्थेत दाखवण्यात आला आहे. त्यानंतर त्याला सुळावर लटकावून त्याचे हात आणि पाय कापण्यात आल्याचे व्हिडिओत दाखवण्यात आले आहे.

आणखी चार हेरांचा उल्लेख
या व्हिडिओला 'डिटरिंग द स्पाइस 1' (हेराला 1 घाबरवणे) असे आहे. यापुढेही अशाप्रकारचे व्हिडिओ जारी केले जाणार असल्याचे त्यावरून स्पष्ट होते. मिडल ईस्टमध्ये काम करणारे एक संशोधक येमन जवाद अल-तमिमी यांनी सांगितले की, व्हिडिओमध्ये जिहादींनी आणकी चार हेरांचा उल्लेख केला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा इतर काही फोटो आणि अखेरच्या स्लाइड्वर पाहा VIDEO
बातम्या आणखी आहेत...