आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहृत ब्रििटश पत्रकाराचा इसिसने जारी केला व्हिडिआे,ब्रिटनचा जॉन कँटली जिवंत असल्याचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने चार वर्षांपूर्वी अपहरण केलेला ब्रिटनचा पत्रकार जॉन कँटली अद्यापही जिवंत आहे. तो मोसूलमध्ये असल्याचा दावा करणारा व्हिडिआे संघटनेने जारी केला आहे. दहशत पसरवून मोसूलमधील कारवाई रोखण्यात यावी, असा इसिसचा व्हिडिआे जारी करण्यामागील उद्देश असू शकतो.

इसिसच्या अमाक नेटवर्कने कँटलीचा हा व्हिडिआे जारी केला. त्यात तो इंग्लिशमध्ये वृत्तनिवेदनाच्या शैलीत बोलताना दिसतो. व्हिडिआेमधील फुटेज नेमके कोणत्या तारखेचे आहे, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. कँटली यांचे व त्यांचे सहकारी जेम्स फॉली यांचेही अपहरण करण्यात आले होते. सिरियातील युद्धादरम्यान नोव्हेंबर २०१२ मध्ये दोन्ही पत्रकारांचे अपहरण झाले होते. त्यानंतर फॉलीची इसिसच्या दहशतवाद्यांनी हत्या केली होती. ‘विदाऊट बॉर्डर्स’ या संस्थेने इसिसने आेलीस ठेवलेल्यांचा अशा प्रकारे वापर सुरू केल्याबद्दल िनषेध केला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील फौजांनी इराकमध्ये इसिसच्या विरोधात मोठी आघाडी सुरू केली आहे. मध्य मोसूलमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून आक्रमक कारवाई सुरू आहे. कारवाईत इराकी फौजादेखील सामील झाल्या आहेत. १७ ऑक्टोबर रोजी इसिसच्या विरोधातील कारवाईला सुरुवात झाली आहे. अद्यापही या प्रदेशावर दहशतवादी संघटनेची पकड आहे. त्यांची पकड अद्यापही ढिली झालेली नाही.
इसिसमध्ये जाण्याचा प्रयत्न, विद्यार्थिनीला रशियात अटक
मॉस्को | इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेत सामील होण्याचा व सिरियात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणीला रशियात अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी तिच्यावर अटकेची कारवाई झाली होती. वरवारा कारौलोवा असे विद्यार्थिनीचे नाव असून तिला पाच वर्षांची कैद व्हावी, अशी मागणी सरकारी पक्षाने केली.
अलेप्पोमधून १५० जणांची सुटका
सिरिया युद्धात होरपळत अाहे. अलेप्पोमधून १५० नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. त्यात नागरिक, अनेक आजारी लोकांचा समावेश आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सिरियातील लष्कराने अलेप्पो शहरावर पुन्हा नियंत्रण मिळवले आहे. अलेप्पो इसिसचा अनेक वर्षे गड राहिला. परंतु ८० टक्के प्रदेशावर पुन्हा सैन्याने वर्चस्व मिळवले आहे. आतापर्यंत या भागातील दहा हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. अद्यापही अलेप्पोच्या पूर्वेकडील प्रदेशातून इसिसच्या दहशतवाद्यांना पळवून लावण्यात यश आलेले नाही. २०१२ पासून सैन्य व सरकार त्यासाठी प्रयत्न करत आहे. पूर्व अलेप्पोत आतापर्यंत ३८४ मृत्यू झाले.
बातम्या आणखी आहेत...