आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेवर हल्ल्यासाठी पाकिस्तानकडून खरेदी करणार अणुबॉम्ब, ISIS चा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रक्का (सीरिया) - दहशतवादी संघटना आयएसआयएसने (इस्लामिक स्टेट) पुढील एक वर्षात आम्ही अण्वस्त्र सज्ज असू, असा दावा केला आहे. त्यांनी हा दावा त्यांच्या प्रचारासाठीचे नियतकालिक 'दाबिक'च्या ताज्या अंकात केला आहे. या नियतकालिकात प्रकाशित लेखामध्ये म्हटले आहे, की पुढील एक वर्षात संघटना पाकिस्तानकडून अणू बॉम्ब खरेदी करेल आणि तस्करीच्या मार्गाने त्याला अमेरिकेत पाठवून तिथे स्फोट घडवून आणला जाईल. हा लेख ब्रिटनाचा बंदिवान आणि फोटो जर्नलिस्ट जॉन कँटलीने लिहिला आहे. जवळपास दोन वर्षांपासून कँटली आयएसआयएसच्या ताब्यात आहे.
अब्जो डॉलर जमा असल्याचा दावा
आयएसआयएसच्या बँक खात्यांमध्ये अब्जो डॉलर असल्याचा दावा 'द परफेक्ट स्टॉर्म' या लेखात करण्यात आला आहे. आयएसआयएस या पैशांच्या जोरावर पाकिस्तानकडून शस्त्रास्त्र दलालांच्या माध्यमातून पहिला अणूबॉम्ब खरेदी करेल असा दावा त्यांनी केला आहे. लेखात म्हटले आहे, की 'न्यूक'ची व्यवस्था झाली नाही तर, त्याबदल्यात 'काही टन स्फोटकांचा' वापर केला जाईल. त्यात पुढे असेही म्हटले आहे, की आयएसआयएस आपला कोणताच प्लॅन गुप्त ठेवत नाही. त्यांनी अमेरिकला त्याच्या हद्दीत घुसून हदरवण्याची तयारी केली आहे. लेखाचा शेवट इशाऱ्याने करण्यात आला आहे. आयएसआयएस वेगाने पसरत चालली आहे. आता तो दिवस दूर नाही जेव्हा पश्चिमी जगतातही त्यांची ताकद पाहायाला मिळेल.
गुप्तचर संस्थांनी सतर्क राहावे
बंकिंगहम विद्यापीठाच्या संरक्षण आणि गुप्तचर अभ्यास केंद्राचे संचालक अँथनी ग्लीस यांनी म्हटले आहे, की आयएसआयएस पाकिस्तानकडूनच नाही तर जगातील कोणाकडूनही अण्वस्त्र खरेदी करु शकतात. त्यांच्या या दाव्यावर विश्वास ठेवण्यास वाव आहे. त्यामुळे पश्चिमी देशातील गुप्तचरसंस्थांनी सतर्क राहिले पाहिजे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधीत छायाचित्रे