आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Says It Killed An Italian On Streets Of Bangladesh

बांगलादेशात ISIS ने इटालियन व्यक्तीची केली हत्या, भारताला धोका वाढला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका- बांगलादेशाची राजधानी ढाकाच्या डिप्लोमॅटिक क्वार्टर भागात एका इटालियन नागरिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून, या घटनेची जबाबदारी दहशतवादी संघटना ISIS स्वीकारली आहे. दहशतवादी कारवायांवर नजर ठेऊन असलेल्या इंटेलिजेन्स मॉनिटरिंग ग्रुप SITE ने हा दावा केला आहे. इस्लामिक स्टेटने सोमवारी एक ऑनलाइन स्टेटमेंट प्रसिद्ध करुन या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. ISIS ने बांगलादेशात अशाप्रकारे एखाद्याची हत्या केल्याची ही पहिलीच घटना आहे.

या घटनेसंदर्भात इटलीच्या दुतावासाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. ढाका पोलिसांनीसुद्धा या घटनेविषयी मौन बाळगले आहे. पोलिस अधिकारी मुखलेसर रहमान यांनी सांगितले की, 'सध्या काहीच सांगू शकत नाही. आमचा तपास सुरु आहे.'

अमेरिका, ब्रिटनने जारी केला अलर्ट
बांगलादेश स्थित अमेरिका आणि ब्रिटनच्या दुतावासांनी त्यांच्या नागरिकांना सजग राहण्यास सांगितले आहे. दोन्ही देशांच्या गुप्तचर विभागांना मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी पश्चिमी देशांच्या नागरिकांना नुकसान पोहचवू शकतात.

काय आहे प्रकरण?
मिडिया रिपोर्टनुसार, सोमवारी रात्री 58 वर्षीय सेसारे टवेला घराजवळ जॉगिंग करीत होते. यावेळी तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या देशांवर आहे ISIS चा प्रभाव...