आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS च्या दहशतवाद्यांनी निर्दयतेने युवकाचे हात छाटले, चोरीचा होता आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: कागदाच्या यंत्राने आरोपीचे हात छाटताना दहशतवादी
बगदाद - दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने एका युवकाचा हात छाटल्याचे व्हिडिओ प्रसिध्‍द झाले आहे. इराकमधील या घटनेचा व्हिडिओत एक धर्मगुरु आरोपीविरुध्‍द निर्णय देताना दिसत आहे. त्यानंतर कागदाच्या यंत्राने आरोपीचे हात छाटण्‍यात आले आहे. यावेळी अनेक लोक हजर असल्याचे दिसत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, व्हिडिओ इराकच्या टिग्रीस नदीजवळ तयार करण्‍यात आल्याचे म्हटले जात आहे. फुटेजमध्‍ये आरोपी युवकाचा चेहरा दाखवण्‍यात आलेला नाही. परंतु त्याचे वय 20 ते 30 च्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. टिग्रीस नदीच्या खो-यात सक्रिय असलेला इस्लामिक स्टेटची सलंग्न संघटना विलायत दिगलाहने संबंधित घटनेचा व्हिडिओ प्रसिध्‍द केला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, घटनेचे फोटोज