आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isis Develop Sophisticated New Weaponry Shooting Down Passenger Jets

ISIS बनला अधिक घातक, विकसित केले हवेत मारा करणारे शस्त्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन : इस्लामिक स्टेटने(आयएसआयएस) हल्ल्यांची संख्‍या वाढवण्‍यासाठी नवीन शस्त्रास्त्रे विकसित केली आहेत. त्यांच्या शास्त्रज्ञांनी आणि शस्त्रास्त्र तज्ज्ञांनी असे शस्त्र विकसित केले, की ज्याने हवेतच प्रवाशी विमानावर हल्ला करुन ते नष्‍ट केले जाऊ शकते
काय आहे खास या शस्त्रात ...
- आयएसआयएसच्या शास्त्रज्ञांनी रक्का येथील प्रयोगशाळेत थर्मल बॅटरी बनवली आहे.
- ही बॅटीर जमिनीवरुन हवेत मारा करणा-या मिसाइलमध्‍ये वापरली जाईल.
- तज्ज्ञांनुसार, दहशतवादी गट पूर्वीपासूनच संहारक शस्त्रास्त्रे वापरत आहे. मात्र मिसाइल कार्यान्वित होण्‍यासाठी थर्मल बॅटरी अत्यावश्‍यक आहे.
- मिसाइलला उंचावर घेऊन जाण्‍यासाठी त्याची भूमिका महत्त्वाची असते. ते विना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवले जाऊ शकत नाही.
आता काय करणार आयएसआयएस...
- बॅटरीच्या मदतीने आयएसआयएस आपल्या हजारो मिसाइल्स वापर करु शकेल, असे मानले जाते.
- स्काय न्यूजनुसार, थर्मल बॅटरी 99 टक्के निशाण्‍यावर अचूक मार करु शकते.
- बॅटरीच्या मदतीने दहशतवादी संघटना कालबाह्य शस्त्रास्त्रांचा वापर करु शकते.
स्काय टीव्हीने जारी केला व्हिडिओ...
- स्काय टीव्हीने बॅटरी बनवण्‍याचा व्हिडिओही जारी केला आहे.
- स्काय न्यूजनुसार, हा व्हिडिओ त्यांना फ्री सीरियन आर्मीच्या एका बंडखोराने दिला आहे. व्हिडिओ तुर्कस्तानमधील आयएसआयएसच्या ट्रेनरने बनवला आहे.
- बॅटरी रिमोटने नियंत्रण केले जाणा-या कारमध्‍ये चाचणी घेतल्याचे दिसत आहे. यात लक्ष्‍य कसे उडवले जाते हे दाखवले आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा... अमेरिकेने तालिबानविरुध्‍द केला होता वापर