आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: लिबियाच्या समुद्र किनारी ISIS ने केली 21 ख्रिश्चनांची गळा कापून हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ISIS ची मिडीया विंग अल-हयातने प्रसिध्द केलेला व्हिडीओ - Divya Marathi
ISIS ची मिडीया विंग अल-हयातने प्रसिध्द केलेला व्हिडीओ
त्रिपोली - त्रिपोली - दहशतवादी संघटना ISISने रविवारी एक नवीन व्हिडीओ प्रसिध्द केला. या व्हिडीओमध्ये या दहशतवाद्यांकडून इजिप्तमधील 21 ख्रिश्चनांचा गळा कापून हत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे. या अल्पसंख्यांक समुहाच्या सर्वच लोकांना लिबियाच्या समुद्री किनाऱ्यावर मारण्यात आले आहे. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल-सीसीने या बंदीवानांच्या हत्येला दुजोरा दिला असून याविरोधात इजिप्तने लिबियाती ISIS च्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ला केला आहे. रविवारी रात्री या हत्येचा व्हिडीओ प्रसिध्द झाल्यानंतर इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल सीसी यांनी चेतावणी देत याचा बदला घेतला जाईल असे म्हटले होते. तसेच सीसी यांनी देशात सात दिवसांच्या दुःखवट्याची घोषणा करत राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची आपातकालीन बैठक बोलावली आहे आणि या घटनेची पुर्ण माहिती घेतली आहे. अमेरिकेनेसुध्दा ISIS च्या या हल्ल्याचा तिव्र निषेध केला आहे.
पाच मिनिटाच्या या हाय डेफिनेशन (HD) व्हिडीओमध्ये नारंगी रंगाचे जंपसुट परिधान केलेल्या १५-२० लोकांना समुद्र किनारी नेल्याचे दाखवण्यात आले आहे. या सर्वच बंदीवानांचे हात बांधलेले आहेत. तसेच त्यांच्या डोळ्यावर काळी पट्टीही बांधण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये प्रत्येक बंदीवानासोबत एक दहशतवादी दिसून येतो.

या संघटनेच्या अस हयातया मिडिया विंगद्वारे प्रसिध्द करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एक चेहरा झाकलेला दहशतवादी इंग्रजीत बोलतो, "ज्या समुद्रात तुम्ही ओसामा बिन लादेनचा मृतदेह लपवला आहे, अल्लाची शपथ, आम्ही तुमचे रक्तही त्याच समुद्रात टाकून देऊ!" या लोकांची गळा कापून हत्या केली गेली असावी असा अंदाज जुना व्हिडीओ पाहून लावण्यात येत आहे.

सध्या ISIS ने इराक आणि सिरियाचा मोठा भूभाग काबिज केला आहे, मात्र या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेल्या लिबियाच्या समुद्र किनाऱ्यामुळे ही संघटना लिबियातही सक्रीय असल्याचे दिसून येते. या व्हिडीओतून इजिप्तच्या 21 खिस्तांचे डिसेंबर आणि जानेवारीमध्ये लिबियाच्या सिरते या किनारी प्रदेशातून अपहरण करण्यात आले होते.

अल सीसी यांनी दिली सुडाची चेतावणी
इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सीसी यांनी या 21 ख्रिस्तांची गळा कापून हत्या केल्यामुळे तिव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. ते म्हणाले की, मुस्लिम देशांला याचे योग्य प्रत्यूत्तर मिळेल. अमेरिकेनेसुध्दा या कृत्याची टीका केली आहे.

रविवारी रात्री प्रकाशित करण्यात आलेल्या या व्हिडीओनंतर टीव्हीवर राष्टाला संबोधित करताना सीसी म्हणाले की,आम्ही शांत बसणार नाही. देशाकडून योग्य वेळी आणि योग्य प्रकारे या कृत्याचे प्रत्यूत्तर मुस्लिम देशाला देण्यात येईल."

पुढील स्लाईडवर पाहा, या भयावह व्हिडीओचे स्क्रिन शॉट...