आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS ने 3 नागरिकांचा केला शिरच्छेद, गुप्तचर असल्याचा लावला आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: आयएसआयएसचा दहशतवादी शिरच्‍छेद करताना.)
बगदाद - इस्लामिक स्टेटच्या (आयएसआयएस) दहशतवाद्यांनी तीन नागरिकांचा शिरच्छेद केला आहे. इराक सरकारचे गुप्तचर असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्‍यात आला होता. नंतर सार्वजनिक ठिकाणी शिरच्‍छेद करुन हत्या करण्‍यात आली. दहशतवादी संघटना आयएसआयएसने ठार मारण्‍यात आलेल्या लोकांची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत. मात्र त्यात दोघेच दिसत आहेत.
प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्या छायाचित्रांमध्‍ये एक दहशतवादी तिघांच्या हत्येचा आदेश देताना दिसत आहे. जवळच इतर बुरखा घातलेले बंदूकधारी दहशतवादी उभे आहेत. एक धारदार हत्याराने दहशतवादी एकेक करुन तीन जणांचा शिरच्छेद करतो. एका वृत्तानुसार संबंधित छायाचित्रे वायव्य इराकच्या निनेवाह प्रांतातील आहे.
जिहादी कारवायांवर नजर ठेवणारी संस्था 'सीरियन ह्यूमन रायट्स मॉनिटर'च्या एका अहवालानुसार दहशतवादी संघटना ISIS ने इराक आणि सीरियात गेल्या वर्षी इस्लामिक स्टेटची घोषणा केल्यानंतर 1 हजार 362 पेक्षा जास्त नागरिकांची हत्या केली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, शिरच्छेद केलेल्या नागरिकांचे फोटो... आणि इतरही संबंधित फोटो...