आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, कुर्दिश महिला फायटर्सला का घाबरतात ISIS दहशतवादी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - कुर्दिश महिला फायटर्स - Divya Marathi
फाइल फोटो - कुर्दिश महिला फायटर्स
रक्का - कुख्यात दहशतवादी संघटना आयएसआयएसचे लढाऊ तरुण महिलांचा सामना करण्यास घाबरतात. त्यांचे मानने आहे की महिलांकडून मृत्यू आला तर त्यांना 'जन्नत' मिळणार नाही. कुर्दिश महिला यूनिटच्या कमांडरने सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे.

काय म्हणाल्या कुर्दिश महिला कमांडर
सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत 21 वर्षांच्या कुर्दिश महिला कमांडर तेहलदान म्हणाल्या, 'दहशतवाद्यांमध्ये आमच्या नावाची दहशत आहे.' आयएसआयएसच्या दहशतवाद्यांचा विश्वास आहे की त्यांचा मृत्यू जर एखाद्या महिलेच्या हातून झाला तर त्यांना जन्नत मध्ये जागा मिळत नाही.

कुर्दिश पीपल्स प्रोटेक्शन यूनिट्सच्या वुमन्स प्रोटेक्शन यूनिट ही कुर्दिश महिलांची फौज आहे. त्या इराक आणि सीरियामध्ये कुर्दिश भागात आयएसआयएसविरोधात लढतात.

इस्लामच्या नावाने दगाबाजी करत आहे दहशतवादी
>> पूर्वोत्तर सीरियामध्ये अल-हौल टाऊन भागात तैनात तेहलदानने सांगितले, की आयएसचे दहशतवादी भीत्रे आहेत. त्यांना वाटते की ते इस्लामसाठी जिहाद करत आहेत.
>> तेहलदानच्या यूनिटची दुसरी फायटर एफिलिन ने इशारा देत म्हटले, की दहशतवाद्यांनी अल-हौल भागात पुन्हा पाय ठेवला तर त्यांच्यापैकी एकही जिवंत परत जाणार नाही.

कोण आहेत कुर्दिश महिला फायटर्स
>> कुर्दिश पीपल्स प्रोटेक्शन युनिट्समध्ये 50 हजार फायटर्स आहेत. त्यातील 20 टक्के महिला फायटर्स आहेत.
>> कुर्दिश फायटरमध्ये जास्तित जास्त संख्या पुरुषांची आहे. ते सीरियामध्ये आयएसविरोधातील युद्धात महत्त्वाची भूमिका पार पाड आहे.
>> गेल्या वर्षी 2014 मध्ये आयएसने इराकच्या सिंजर भागावर ताबा मिळविला होता.
>> येथे शेकडो लोकांना मारण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने यजिदींना बंदिवान करण्यात आले होते.
>> त्यानंतर बहुतेक यजिदींनी सिंजरला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी ते कुर्दिश पेशमर्गा फायटर्ससोबत गेले.
>> आपली मातृभूमी परत मिळविण्यासाठी पुरुषांबरोबर महिलाही आयएसविरोधातील युद्धात उतरल्या.
>> यात सर्वाधिक महिला या 18 ते 25 वर्षांच्या दरम्यानच्या आहेत. यातील अनेक अशाही आहेत ज्यांचे कुटुंब आहे.
>> या फायटर्स कुर्दिस्तानच्या वेगवेगळ्या भागातून आल्या आहेत.
>> त्या आपसात एकमेकांना कॉम्रेड म्हणतात. त्याचा अर्थ, प्रत्येक संकटाचा सामना एकत्र येऊन करु.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कुर्दिश महिला फायटर्सचे PHOTOS...