आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ISIS चा गड रक्का येथील PHOTOS, असे मारले जाताहेत दहशतवादी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक दहशतवादी रुगणालयांमध्ये नागरिकांचे ओलीस ठेवून लपले आहेत. - Divya Marathi
अनेक दहशतवादी रुगणालयांमध्ये नागरिकांचे ओलीस ठेवून लपले आहेत.
इंटरनॅशनल डेस्क - 2011 मध्ये कुख्यात दहशतवादी संघटना अलकायदाच्या इराकची शाखा संपवून जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी संघटना बनलेली ISIS शेवटची घटका मोजत आहे. सीरिया आणि इराकमधून दहशतवाद्यांचा 80 टक्के खात्मा झाल्याचे रशिया आणि अमेरिकेने नुकतेच स्पष्ट केले. उरलेल्या दहशतवाद्यांना सुद्धा शोधून-शोधून ठार मारले जात आहे. नानाविध प्रकार नागरिकांचा नरसंहार करून जगभरात दहशत पसरवणाऱ्या इसिसचे दहशतवादी जीव वाचण्यासाठी रुगणालये आणि मैदानांत आश्रय घेत आहेत. ठिक-ठिकाणी निष्पाप नागरिकांचे अपहरण करून लपण्याचे प्रकार सुरू आहेत. 
 

इसिसने इराकमध्ये मोसूल आणि सीरियात रक्का शहराला आपली राजधानी केले होते. यापैकीच रक्का येथे लोकांचा नरसंहार करणाऱ्या इसिसचा नरसंहार सुरू आहे. अमेरिका समर्थक सीरियन बंडखोर, आणि कुर्दिश सैनिकांना दूर ठेवण्यासाठी रक्का येथे दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणी भूसुरुंगा लावल्या आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दहशतवाद्यांनी स्थानिकांना बंधक बनवले आहे. सीरियन बंडखोरांच्या कमांडरने दिलेल्या माहितीप्रमाणे, शहरात आता 350 दहशतवादी उरले आहेत. 
 

सरेंडर करत नाहीत इसिसचे दहशतवादी
इसिसचा म्होरक्या अबु बकर अल बगदादीने 28 सप्टेंबर रोजी दहशतवाद्यांना एक आदेश दिला. त्यामध्ये हल्ल्याच्या परिस्थितीत कुठल्याही इसिस सदस्याने आत्मसमर्पण करू नये असे सांगितले आहे. विशेष म्हणजे, जगभरात बगदादी गंभीर जखमी होऊन ठार झाल्याची चर्चा सुरू असतानाच बगदादीचा हा मेसेज समोर आला.
 

पुढील स्लाड्सवर पाहा, असा असतो दहशतवादी आणि सैनिकांमध्ये खरा संघर्ष...
बातम्या आणखी आहेत...