आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडव्या तरुणांची फौज तयार करण्याची आयएसची योजना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रक्का - कुविख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने (आयएस) दहशतवादी कारवायांसाठी लढवय्या कडव्या तरुणांची नवी तुकडी तयार करण्याची योजना हाती घेतली आहे. सोशल मीडियावर नुकत्याच जारी झालेल्या सात मिनिटांच्या एका व्हिडिओ फुटेजमधून या बाबीचा खुलासा झाला आहे. या व्हिडिओत दहशतवादी लोखंडी जाळीच्या एका पिंजर्‍यात तरुणांना सोडून त्यांना लढण्यासाठी प्रवृत्त करताना दिसत आहेत. तसेच त्यांना घातपाती कारवाया कशा पद्धतीने करायच्या याचेही प्रशिक्षण देताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर सात मिनिटांचा अपप्रचाराच्या व्हिडिओमध्ये तरुणांना आपसात लढण्याचे प्रशिक्षण कशा पद्धतीने दिले जात आहे याची माहिती सांगण्यात आली आहे. यात वरच्या बाजूला आयएसचा झेंडाही िदसतो आहे. लोखंडी पिंजर्‍यात सशस्त्र कमांडर त्यांना लढण्यासाठी प्रवृत्त करताना दिसतात. दरम्यान, काही कट्टरपंथी मुलांना छडीने मारताना दिसतात. त्यानंतर ते तरुण जमिनीवर पडून रांगू लागतात. काही जण पोटावर सरपटतात. व्हिडिओमध्ये काही युवक डोक्यावर टाइल्स तोडतानाही दिसत आहेत. बकिंगहम युनिव्हर्सिटीमधील सेंटर ऑफ सिक्युरिटी अँड इंटेलिजन्स स्टडीजच्या संचालकांनुसार हा व्हिडिओ इराकमध्ये आयएसच्या बेस कँपवर तयार करण्यात आला आहे. याचा उद्देश विदेशी मुलांना आयएसच्या लढ्याकडे आकर्षित करणे त्यांना सहभागी करून घेणे हा आहे.

मुलांना टार्गेट करण्याचा उद्देश
प्रोफेसर अँथोनी ग्लिस यांनी सांगितले की, आयएससाठी मुलांची भरती करण्याआधी त्यांच्या मनावर आयएसच्या क्रौर्य दहशतीचा पगडा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ्या मुलांना विचित्र कवायतींद्वारे प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील लढण्याची िजद्द वाढवली जाते. इतकेच नव्हे, तर मुलांना धातूच्या ट्यूबवरून रांगत पुढे सरकण्यास शिकवले जाते. हे करताना त्यांच्या डोक्यावरून गोळ्या झाडल्या जातात.

पुढे वाचा, दहशतवादी जॉनचे लिबियाकडे पलायन...
बातम्या आणखी आहेत...