आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: जेव्हा ISIS च्या तावडीतून सुटले 200 यजीदी नागरिक, नातेवाईकांना पाहून अश्रू तरळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किरकुक (इराक) - अत्यंत निर्दयी अशा दहशतवादी संघटना ISIS ने 200 पेक्षा जास्त बंधकांना बंधनमुक्त केले आहे. दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटका झाल्याने महिलांसमवेत वयोवृध्दांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. आप्तेष्ठांना सही सलामत पाहून नातेवाईकांना गहिवरून आले, तर काहींना यांच्यासोबत आपल्या जवळचे या जगात नाहीत याचे दुःख होते. दहशतवाद्यांनी मागील वर्षी ऑगस्टमध्ये यजीदी समुदायाच्या या लोकांचे उत्तर-पश्चिम इराकमधून अपहरण केले होते.
एका वयस्कर यजीदी महिलाने सांगितले की, मागील वर्षी ऑगस्टमध्ये दहशतवाद्यांनी मला कैद केले होते. या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, सिंजार भागात मुस्लीम राज्याकडून कुर्दिश सैन्य अत्यंत लज्जास्पद हारले होते. यामध्ये शेकडो नागरीक मारले गेले होते, तर हजारांपेक्षा जास्त दहशतवाद्यांना जबरदस्ती उचलण्यात आले होते. मला तर मी माझ्या मुलांना पाहू शकेल असे कधी वाटलेच नाही. मात्र सुटका झाल्यानंतर बुधवारी ही महिला आपल्या मुलांना भेटली.
यापूर्वीही ISIS ने 200 पेक्षा जास्त यजीदी नागरिकांना बंधक बनवले होते. मात्र दहशतवादी अशा लोकांना बंधनमुक्त करत आहेत, जे वयस्कर आणि असहाय्य आहेत. यजीदी कार्यकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ISIS च्या ताब्यात अजूनही अनेक यजीदी महिला आहेत, जे त्यांच्या लैंगिक शोषणाला बळी पडत आहेत.


पुढील स्लाईडवर पाहा, दहशतवाद्यांकडून सुटका झालेल्या यजीदी बांधवांचे फोटो...