आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isis Greatest Challenge Must Delink Terrorism From Religion Pm Narendra Modi

ISIS सर्वात मोठा धोका, धर्माला दहशतवदाशी जोडणे बंद व्हावे - PM मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट जगापुढील सर्वात मोठा नवा धोका आहे. दहशतवादाला धर्माशी जोडू नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत शाश्वत विकासावरील भाषणानंतर पंतप्रधान मोदींनी जॉर्डनचे किंग अब्दुल्ला यांची भेट घेतली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुन यांनी सांगितले, दोन्ही नेत्यांमध्ये युवकांचा कट्टरपंथांकडे वाढणारा ओढा थांबवणे आणि अशी तत्त्वे आणि दहशतवादी संदेश पसरवण्यापासून त्यांनो रोखणे यावर चर्चा झाली.

दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली
विकास स्वरुप यांनी सांगितले, दोन्ही नेत्यांनी मान्य केले की जागतिक समुहासमोर सध्या जे आव्हान आहे त्यात ISIS हा सर्वात मोठा धोका आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, दहशतवादाला धर्माशी जोडणे बंद झाले पाहिजे. आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि आयएसआयएस यासारख्या संघटनांना जगातील सर्व देशांनी एकत्र येऊन उत्तर दिले पाहिजे. मोदी आणि किंग अब्दुल्ला यांच्यात संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्यावरही चर्चा झाली. किंग अब्दुल्ला म्हणाले की ते भारताला सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्व देण्याच्या बाजूचे आहेत.

स्वरुप यांनी सांगितले, की पंतप्रधानांनी किंग अब्दुल्ला यांच्या प्रभावी नेतृत्वाचे आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा त्यांनी ज्या धाडसाने मुकाबला केला त्याची प्रशंसा केली. इराक आणि सिरियामध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडवण्यासाठी जॉर्डनने केलेल्या मदतीसाठी मोदींनी किंग अब्दुल्लांना धन्यवाद दिले.