आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Holds 50 Civilians Hostage After Raiding Syrian Village

सिरियात आयएसने ठेवले ५० गावकर्‍यांना ओलीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरुत - मध्य सिरियातील एका गावात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने ५० गावकर्‍यांना ओलीस ठेवल्याचे उघडकीस आले आहे. दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्यांमध्ये महिला-मुलांचाही समावेश आहे.

हामा प्रांतातील माबुजेह गावात दहशतवाद्यांनी गावकर्‍यांचे अपहरण केले आहे. ३१ मार्च रोजी गावकर्‍यांना आेलीस ठेवल्याचा दावा सिरियातील मानवी हक्कविषयक संघटनेने केला आहे. अपहरण करण्यात आलेल्यांमध्ये बहुतांश सुन्नी समुदायातील नागरिकांचा समावेश आहे. त्यात १५ महिला आहेत. महिलांना गुलामासारखी वागणूक दिली जात असावी, असे संघटनेने म्हटले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद हे शियापंथीय आहेत. त्यांच्या समर्थकांकडून देशात आंदोलन केले जाते. दरम्यान, कुर्द, ख्रिश्चनांवर सिरियात हल्ले करण्यात येत असल्याचे अलीकडच्या अनेक घटनांतून स्पष्ट झाले आहे. एवढेच नव्हे, तर आयएसने देशात अल्पसंख्याक सुन्नी नागरिकांची सामूहिक हत्या केली होती.

अल्पसंख्याकांना लक्ष्य
सिरियात दहशतवादी सातत्याने अल्पसंख्याक सुन्नी समुदायाला लक्ष्य करत आले आहेत. सुन्नी समुदायाकडून इस्लाम धर्माच्या नियमांची पायमल्ली होत असल्याच्या आरोपावरून या समुदायाला लक्ष्य केले जाते.