आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS\'s Income Drops 30 Percent On Lower Oil, Tax Revenue

इसिसचे वार्षिक उत्पन्न ३० टक्क्यांनी घटले, आतापर्यंत २२ टक्के जमीन गमावली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेचे उत्पन्न गेल्या वर्षभरात ३० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीची धडपड करण्यासाठी संघटनेने चित्र-विचित्र कर लावले आहेत. त्यात लोकांनी घरांवर टीव्हीच्या छत्र्या लावल्या, एका शहरातून दुसऱ्या शहरांत जाण्यावरही कर लावण्यात आले आहेत. या संघटनेने आतापर्यंत त्यांच्या ताब्यातील २२ टक्के जमीन गमावली असून दहशतवादी लढाईत २५,००० लढवय्ये गमावले आहेत.

अमेरिकन सल्लागार संस्था अायएचएसने एका अहवालात ही माहिती िदली आहे. त्यात म्हटले आहे की, आयएसच्या ताब्यातून अनेक महत्त्वपूर्ण शहरे, गावे गेली आहेत. संघटनेने घोषित केलेल्या खलीफा राजमध्ये २०१५ मध्ये लोकसंख्या ९० लाख होती. आता त्यात ३० लाखांनी घट होऊन ही संख्या ६० लाखांवर आली आहे. त्या कारणामुळे संघटनेचे उत्पन्नदेखील घटले आहे. संघटनेला विविध प्रथा, परंपरांवर लावलेल्या करांमधून िमळणाऱ्या उत्पन्नात आठ कोटी डॉलर (जवळपास ५.३१ अब्ज रुपये) प्रतिमहिना इतकी घट झाली आहे. एकेकाळी आयएस संघटना सर्वात श्रीमंत समजली जात होती, परंतु आता तिच्यापुढे गंभीर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. २०१४ पासून आतापर्यंत आयएसने त्यांच्या ताब्यातील २२ टक्के जमीन गमावली आहे. तेलाचे उत्पादनदेखील ३३ हजार बॅरल दरदिवसावरून घटून २१ हजार बॅरल प्रतिदिन इतके राहिले आहे. तेलाच्या तस्करीतून होणाऱ्या उत्पन्नात तब्बल ४३ टक्क्यांनी घट झाली आहे. अमेरिका व इतर देशांनी केलेल्या हवाई हल्ल्यात आयएससाठी लढणारे २५ हजार लढवय्ये मारले गेले आहेत. त्याच्या दहशतीमुळे संघटनेकडे आकर्षित होणाऱ्यांचे व त्यात भरती होणाऱ्यांचे प्रमाणही मंदावले आहे.
उत्पन्नवाढीसाठी विचित्र कर
> रस्त्यांवर चुकीच्या दिशेने कार चालवल्यास दंड
> कुराणाशी संबंधित चुकीची माहिती िकंवा उत्तर दिल्यास दंड
> घरांच्या छतावर सॅटेलाइट डिश लावणे
> एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी कर