आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतात इसिसचे ६८ हस्तक ताब्यात, लोकसभेत अहिर यांनी दिली माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) आणि राज्यांतील पोलिस यंत्रणांनी केलेल्या संयुक्त तपासामध्ये आतापर्यंत देशातून ६८ इसिस हस्तक ताब्यात घेण्यात आल्याची माहिती लोकसभेत देण्यात आली.
केंद्रीय गृहमंत्रालयाचा तपास अहवाल गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लोकसभेत सादर केला. सुरक्षा यंत्रणेने आतापर्यंत ५० जणांना अटक केली असून पैकी ११ संशयित महाराष्ट्रातील आहेत.
तेलंगणात ११, कर्नाटकात ७, उत्तराखंडमध्ये ४, केरळात ६, बिहारमध्ये १, तर तामिळनाडूत २ हस्तकांना अटक केल्याचे यात म्हटले आहे. इसिसचा कट्टरवाद रुजवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर हे करत असल्याचे तपासात दिसून आल्याचे अहिर म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...