आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS तयार करतेय 'चिकन बॉम्ब'? समोर आले आत्मघातकी कोंबड्यांचे PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉम्ब बांधलेली कोंबडी, इस्लामिक स्टेट हल्ल्यासाठी त्यांचा वापर करत आहे. - Divya Marathi
बॉम्ब बांधलेली कोंबडी, इस्लामिक स्टेट हल्ल्यासाठी त्यांचा वापर करत आहे.
लंडन - ISIS या दहशतवादी संघटनेकडे असलेला शस्त्रसाठा कदाचित कमी झाला असावा. त्यामुळेच त्यांनी रक्तपातासाठी आता कोंबड्यांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. ब्रिटिश न्यूज साइट डेलीमेलच्या वृत्तामध्ये असे अनेक फोटो प्रकाशित करण्यात आले आहेत, ज्यामध्ये कोंबड्याच्या शरिरावर बॉम्ब बांधलेले पाहायला मिळतात. संघटना कुठेही या चिकन बॉम्बद्वारे हल्ला करू शकते असे रिपोर्टमधेय नमूद करण्यात आले आहे.
तज्ज्ञांच्या मते, दहशतवाद्यांना या कोंबड्यांना प्रशिक्षणही द्यावे लागत नाही, किंवा जीव देण्यासाठी त्यांचे ब्रेनवॉश करण्याचीही गरज पडत नाही. पण यावरून शस्त्रसाठा कमी असल्याने ISIS ची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

अमेरिकेच्या नेतृत्वातील अांतरराष्ट्रीय लष्कराने ज्या मार्गावरून सिरिया आणि इराकमध्ये शस्त्र पुरवठा केला जात होता, तो मार्गच नष्ट केला आहे. त्यामुळेच आता अशा प्रकारचे पर्याय ISIS कडून वापरले जात आहेत. तसेच काही दहशतवादी गावठी पद्धतीने बॉम्ब तयार करत आहेत. त्यासाठी त्यांना तुर्कस्तानच्या मार्गाने माल मिळत आहे.

ISIS ने या 'चिकन बॉम्ब'चा वापरही सुरू केला आहे. ही आत्मघातकी कोंबडी हल्ल्याच्या स्थळापर्यंत पोहोचली की, तिला रिमोटद्वारे उडवले जाते. ISIS कडे शस्त्रे एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी गाड्या नसल्याचेही सांगितले जात आहे. त्यासाठी ते शॉपिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॉलीचा वापर करत आहेत.

पुढील स्लाइड्सवर, संबंधित PHOTOS
बातम्या आणखी आहेत...