रक्का (सीरिया) - इस्लामिक स्टेटने(आयएसआयएस) लूटचा आरोप असलेल्या चार व्यक्तींना सुळावर चढवून गोळ्या झाडल्या. ही घटना सीरियाच्या रक्कात घडली आहे. आयएसआयएसची राजधानी रक्काच्या उत्तर भागात या दहशतवादी संघटनेचे प्रचंड नुकसान झाले आहे. अमेरिकेचे हवाई हल्ल्यांबरोबरच कुर्दीश सीरियन डेमोक्रेटिक दलेही या भागातील ब-याच मोठ्या भागावर ताबा मिळवला आहे. बाजारात मृत्यू तांडव...
- आयएसआयएसने चार लोकांना सुळावर चढवून गोळ्या झाडल्याचे छायाचित्रांची मालिका जारी केली आहे.
- यात काळा मुखवटा घातलेले दहशतवादी रक्काच्या व्यस्त मार्केटमध्ये चार लोकांना खांबाला बांधतात.
- यानंतर दहशतवादी त्यांच्या डोकृयात गोळ्या झाडताना दिसत आहे.
- घटना 2 एप्रिलची आहे. हत्या करण्यात आलेल्या लोकांवर लूटीचा आरोप होता.
- गेल्या आठवड्यात आयएसआयएसने आपल्याच 15 लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. त्यांनी आपल्या नेत्याला सुरक्षा दिली नसल्याचा आरोप होता.
पुढे वाचा... सीरियाच्या अनेक भागातून आयएसआयएस माघार