आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Kidnapped 111 Children's To Train For Terrorist Activities

इराक : ISIS ने केले 111 मुलांचे अपहरण, दहशतवादी प्रशिक्षण देणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेरुत - दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी ISIS ने उत्तर इराकच्या मोसूल शहरातून 111 मुलांचे अपहरण केले आहे. या सर्वांना दहशतवादी कारवायांसाठी प्रशिक्षित केले जाणार आहे.

इराकमधील अरबी वृत्तवाहिनी अल सुमारियाने कुर्दिस्तान डेमोक्रॅट पार्टीचे प्रवक्ते सईद मामुजिनी यांच्या हवाल्याने सांगितले की, अपहरण करण्यात आलेली मुले 10 - 15 वयोगटातील आहेत. त्यांना ISIS च्या शाळा आणि प्रशिक्षण केंद्रांमध्ये पाठवण्यात आले आहे. या मुलांच्या अपहरणाला विरोध करणाऱ्या सुमारे 78 नागरिकांना बंदी बनवण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

कुर्दीश अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे वर्षभरापूर्वी शहरावर ताबा मिळवणाऱ्या ISIS ने आतापर्यंत इराकच्या 1420 मुलांचे अपहरण करून त्यांना बळजबरी प्रशिक्षण दिले आहे. दहशतवादी कारवायांसाठी या मुलांचा वापर करण्यात यावा म्हणून त्यांना अशा प्रकारे प्रशिक्षण दिले जाते. मामुजिनी यांनी सांगितले होते की, बाशिकामध्ये झालेल्या पराभवाने खवळलेल्या ISIS ने 15 दहशतवाद्यांची हत्या केली होती. ही हत्या अशा प्रकारे प्रशिक्षण दिलेल्या मुलांकरवीच करण्यात आली होती.

स्थानिक नागरिक आणि सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते, दहशदतवाद्यांनी अल अनबरमध्येही 500 मुलांचे अपहरण केले आहे. ISIS ने जून 2014 मध्ये इराकमध्ये दहशतवादी कारवाया सुरू केल्या होत्या.