आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isis Kidnapped 35 More Egyptian Christians Feared Beheading

ISIS ने पुन्हा इजिप्तचे 35 ख्रिश्‍चनांची केले अपहरण, ओलिसांचा जीव धोक्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : लीबियाच्या समुद्रकिना-यावर ओलिसांसह दहशतवादी
त्रिपोली - लीबियामध्‍ये आयएसआयएसची ठिकाण स्फोटात उडवल्याने त‍िळपापड झालेल्या दहशतवाद्यांनी आणखी 35 ख्रिश्‍चनांचे अपहरण केले आहे.प्राथमिक वृत्तानुसार अपहरण करण्‍यात आलेले सर्व ख्रिश्‍चन हे इजिप्तचे नागरिक आहेत. इस्लामिक स्टेट सर्व ओलिसांची हत्या करुन व्हिडिओ प्रसिध्‍द करु शकते, असे मानले जात आहे.

लीबिया हेराल्डच्या अहवालानुसार, इस्लामिक स्टेट आणि अन्सार अल-शरियाचे दहशतवाद्यांनी फार्म हाऊसमध्‍ये काम करत असलेल्या 35 ख्रिश्‍चन धर्मीयांचे अपहरण केले आहे. तीन दिवसांपूर्वी लीबियाच्या समुद्रकिना-यावर इस्लामिक स्टेटने 21 ख्रिश्‍चनांची हत्या खूप क्रूरतेने केले होते. यानंतर इजिप्तने लीबियात इस्लामिक स्टेटच्या ठिकाणांवर विमानांनी हल्ले केले होते. यास प्रत्युत्तर म्हणून दहशतवाद्यांनी 35 जणांना ओलिस बनवले आहे. रविवारच्या हल्ल्याला चोख उत्तर दिले जाईल, असा इजिप्तचे राष्‍ट्राध्‍यक्ष अब्देल फतह अल-सीसीने इशारा दिला होता.
इस्लामिक स्टेटने प्रसिध्‍द केलेल्या व्हिडिओत नारंगी जंपसूट परिधान केलेले लोक समुद्रकिना-यावर दाखवण्‍यात आले आहे.ओलिसांची हात आणि डोळे काळ्या पट्टीने बांधली गेली होती.शेवटी लाल समुद्राचे पाणी दाखले गेले.
इस्लामिक स्टेटच्या माध्‍यम शाखा अल-हयातने प्रसिध्‍द केलेल्या व्हिडिओत तोंड बांधलेल्या दहशतवादी इंग्रजीत सांगितले, की ज्या समुद्रात तुम्ही ओसाम बिन लादेनचे शव लपवले होते, अल्लाहची शपथ, आम्ही तुमचे रक्त त्याच समुद्रात मिसळू. तो म्हणाला, अल्लाहचा आशीर्वाद आमच्याबरोबर असून लवकरच रोमवरही वर्चस्व मिळवू.
पुढील स्लाइड्सवर पाहा 21 ख्रिश्‍चनांच्या हत्येची छायाचित्रे आणि व्हिडिओ..