आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isis Kidnapped 35 More Egyptian Christians Feared Beheading

आयएसचे क्रूरकर्म सुरूच, 45 जणांना जिवंत जाळल्‍याच्‍या घटनेने खळबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद- इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने पुन्हा एकदा क्रौर्याची परिसिमा गाठली आहे. संघटनेने इराकमध्ये 45 जणांना जिवंत जाळून मारल्याची घटना बुधवारी उजेडात आली आहे.
मृत नागरिक कोण होते, त्यांना का मारण्यात आले हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही; परंतु नागरिकांची हत्या झाल्याचा दावा इराकच्या अल-बगदादी प्रांताच्या पोलिस प्रमुखांनी केला आहे. परंतु मृतांमध्ये अनेक सुरक्षा रक्षकांचा समावेश असावा, असे कर्नल कासिम अल-आेबेदी यांनी म्हटले आहे. सुरक्षा दल तसेच स्थानिक अधिकाऱ्यांची कुटुंबे राहत असलेल्या भागात अतिरेक्यांनी हल्ला केला. दरम्यान, सरकारने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीचे आवाहन केले आहे. दरम्यान, आयएसने जॉर्डनच्या हवाई दलाच्या एका पायलटला याच महिन्याच्या सुरुवातीला जिवंत जाळून मारले होते. त्याचा व्हिडिआे देखील जारी केला होता.
दुर्गम भाग : अनबारप्रांतातील काही भागांचा आयएसने काही दिवसांपूर्वीच ताबा घेतला होता. तेथे माहिती दळणवळणाची व्यवस्था नसल्याने घडामोडींना पुष्टी मिळत नाही.
सुरक्षा दलांना पिटाळले
आयएसनेअल-बगदादी प्रांतातील महत्त्वाच्या अनेक शहरांवर ताबा मिळवला आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या सैन्य तळापासून किलोमीटर अंतरावर असलेल्या अल-असदवर दहशतवाद्यांनी ताबा मिळवला होता. त्यामुळे परिसरातील सुरक्षा दलावर माघार घेण्याची वेळ आली.