आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सेक्सला नकार दिल्याने ISIS ने 19 महिलांची केली हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेरुत- दहशतवाद्यांशी सेक्स करण्यास नकार दिल्याने ISIS या दहशतवादी संघटनेने 19 महिलांची हत्या केल्याचे वृत्त आहे. एक-दोन ऑगस्टला ही घटना झाल्याची माहिती कुर्दिश अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कुर्दिश डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रवक्ते मिमोसिनी यांनी सांगितले, की लहान वयाच्या मुली आणि महिलांची खरेदी-विक्री संघटनेच्या दहशतवाद्यांकडून केली जाते. काही दिवसांपूर्वी सेक्स करण्यास नकार दिल्याने बंधिस्त असलेल्या 19 महिलांची हत्या करण्यात आली.
या घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रसंघाने ISIS दहशतवादी संघटनेकडून खरेदी-विक्री केल्या जाणाऱ्या महिलांची प्राईस लिस्ट जाहीर केली होती.
राष्ट्रसंघाच्या सेक्रेटरी-जनरल फॉर सेक्शुअल व्हायलंसच्या विशेष प्रतिनिधी जैनब बांगुरा यांनी सांगितले आहे, की पेट्रोल कॅनप्रमाणे तरुणी आणि महिलांची खरेदी-विक्री केली जात आहे. खंडणी वसूल करण्यासाठीही खरेदी केली जाते. मुलीची खरेदी करुन तिच्या कुटुंबीयांकडून लाखो रुपयांची खंडणी गोळा केली जाते.
वयानुसार लावली जाते किंमत
1 ते 9 पर्यंतच्या मुलीची किंमत 165 डॉलर (साडे 10 हजार रुपये.)
20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीची किंमत 124 डॉलर (सुमारे 8 हजार रुपये)
40 वर्षांपर्यंतच्या महिलांची किंमत 41 डॉलर (सुमारे 2617 रुपये)
पुढील स्लाईडवर बघा, इतर फोटो...
बातम्या आणखी आहेत...