आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS चा बालसंहार, 200 चिमुरड्यांना घातल्या गोळ्या, पाहा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेरूत - दहशतवादी संघटना ISIS ने सिरियातील 200 मुलांची हत्या केल्याचा एक आश्चर्यकारक व्हिडिओ समोर आला आहे. यमनच्या एका अँटी- ISIS अॅक्टीव्हीस्टने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामुळे सोशल मिडियावर इस्लामिक स्टेटवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. प्राथमिक माहितीनुसार ही घटना सिरियातील अल-रक्का येथील तबका एयरबेसमधील आहे. या सर्वांना असद यांच्या सैन्याची मदत केल्याच्या आरोपात मारण्यात आले आहे. हा व्हिडिओ ऑगस्ट 2014 चा असल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडिओमध्ये काय...
व्हिडिओमध्ये अनेक मुले अर्धनग्नावसल्थेत जमिनीवर पालथे झोपलेले दिसत आहेत. त्यानंतर मशीनगन घेतलेले काही दहशतवादी 'अल्ला-हू-अकबर' च्या घोषणा देत गोळ्या चालवत अशल्याचे दिसते. 30 सेकंद फायरिंक केल्यानंतर त्याठिकाणी धुळीचे लोट उठलेले दिसतात. एवढेच नाही तर त्यानंतर दहशतवादी निवडून निवडून मुलांच्या डोक्यात गोळ्या घालतात.

गेल्यावर्षी केली होती, 1700 सैनिकांची हत्या
विशेष म्हणजे यापूर्वीही ISIS ने तिकरितमध्ये इराकच्या 1700 सैनिकांची हत्या केली आहे. या हत्याकांडाचे फोटो आणि व्हिडीओदेखिल इंटरनेटवर शेअर केले होते.

पुढे पाहा, या घटनेचे PHOTOS...अखेरच्या स्लाइडवर पाहा VIDEO