आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयएसने नऊ दिवसांत २१७ जणांना फासावर लटकवले, ६०० नजरकैदेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरूत - सिरियातील ऐतिहासिक शहर पालमिरामध्ये इस्लामिक स्टेटने नऊ दिवसांत २१७ जणांना फासावर लटकवल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. सिरियाच्या देखरेख करणाऱ्या संस्थेकडून हा दावा करण्यात आला आहे.

इस्लामिक स्टेटचा निर्दयीपणा वाढत चालला असून फाशी दिलेल्यांमध्ये अनेक मुलांचाही समावेश आहे. ६७ नागरिक आणि १५० वर सैनिकांना मृत्युदंड देण्यात आला. १६ मेपासून अशा प्रकारची नृशंस कृत्ये करण्यात आली. आयएसने दीडशे सैनिकांना फाशी दिली. सरकारी फौजांसाठी लढणाऱ्या इतर गटांतील सैनिकांनाही ठार करण्यात आल्याचा दावा संस्थेचे संचालक रामी अब्देल रहमान यांनी केला आहे. पालमिराच्या परिसरात दहशतवाद्यांनी हा हिंसाचार घडवून आणला आहे. पालमिरा भागात आयएसने ४०० जणांची सामूहिक हत्या केल्याचा दावा सिरियातील सरकारी माध्यमांकडून करण्यात आला होता. त्याच्या तासाभरानंतर निरीक्षण करणाऱ्या संस्थेने हा दावा केला आहे . हॉम्स प्रांतात आयएसचा पराभव झाल्यानंतर बिथरलेल्या दहशतवादी संघटनेने हा हिंसाचार घडवला. आयएसने १३ मे रोजी सुखनाह शहरावर ताबा मिळवला. आयएसने ६०० जणांना नजरबंद केल्याचा दावाही संस्थेकडून करण्यात आला आहे.

अमेरिकेलाच आयएस संपवायची इच्छा नाही
अायएसला संपवण्याची खरे तर अमेरिकेलाच इच्छा नाही, असा आरोप इराणचे सल्लागार कासीम सुलेमानी यांनी केला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढत आहेत. कार्टर यांच्या वक्तव्यानंतर सुलेमानी यांचे वक्तव्य जारी झाले किंवा नाही, हे स्पष्ट झाले नाही.

कार्टर असे कसे बोलू शकतात ?
कार्टर यांनी केलेला आरोप इराकने फेटाळून लावले आहे. कार्टर असे बोलूच कसे शकतात ? त्यांचे वक्तव्य ऐकून मला धक्काच बसला, असे इराकचे पंतप्रधान हैदर अल-अबादी यांनी म्हटले आहे. वास्तविक त्यांचा इराकला पूर्ण पाठिंबा आहे. त्यांना काहीतरी चुकीची माहिती मिळाली असावी, त्यातून त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.

‘प्रशिक्षण, शस्त्रे देऊ; पण इराकी फौजेकडे इच्छाशक्तीचा अभाव’
वॉशिंग्टन | रामादी शहरावर आयएसचा ताबा आहे. शहरातून आयएसला हुसकावून लावण्यासाठी झालेल्या अनेक चकमकीत इराकी फौजांचा पराभव झाला आहे. त्यामुळे इराकी फौजांची आता लढाईची इच्छाच दिसत नाही, असा आरोप अमेरिकेचे संरक्षणमंत्री अॅश्टन कार्टर यांनी केला. इराकच्या लष्कराने रामादी परिसरातून माघार घेतली आहे. खरे तर लष्कराने त्या भागातून हटायला नको होते; परंतु यावरून त्यांची लढाईची इच्छाच दिसत नाही. अमेरिका इराकला प्रशिक्षण, उपकरणे देऊ शकते. परंतु सैनिकांना आम्ही इच्छाशक्ती देऊ शकत नाहीत. तरीही मला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. आम्ही प्रशिक्षण देऊ. ते लढतील. त्यांची इच्छाशक्ती वाढेल, अशी अपेक्षा कार्टर यांनी व्यक्त केली.