आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा समोर आली ISIS ची क्रूरता, युद्धबंदींना असे हालहाल करुन मारले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोसुल (इराक)- क्रूर दहशतवादी संघटना ISIS ने एक नवीन व्हिडिओ जाहीर केला आहे. ‘द कन्वॉय ऑफ लाइफ’ नावाच्या या व्हिडिओत एका युद्धबंदीला फिशटॅंकमध्ये बुडवून ठार मारण्यात आल्याचे दिसून येते. त्यासाठी आधी या युद्धबंदीला मोठ्या फिशटॅंकमध्ये उभे केले जाते. त्यानंतर हळूहळू पाणी सोडण्यात येते. जेव्हा फिशटॅंक पूर्ण भरते. हा युद्धबंदी नाकातोंडात पाणी जावून प्राण सोडतो.
 
वाचा कसा रचण्यात आला हत्येचा खेळ
- इराकमधील मोसुल शहर ISIS च्या ताब्यात आहे. याच शहरात फिशटॅंकमध्ये बुडवून युद्धबंदीला ठार मारण्यात आले.
- या व्हिडिओत सांगितले आहे, की हा कैदी जासूस होता. विरोधी गटांना तो ISIS ची माहिती पोहोचवत होता.
- आधी युद्धबंदीला रिकाम्या फिशटॅंकमध्ये उभे केले जाते. त्यानंतर त्यात हळूहळू पाणी सोडले जाते.
- त्यानंतर एक दहशतवादी कैद्याचे शीर पाण्यात बुडवतो. नाकातोंडात पाणी जावून त्याचा जागीच मृ्त्यू होतो.
- 40 मिनिटांच्या या व्हिडिओत एका कैद्याचे शीर चिरतानाही दहशतवादी दिसतात.
- या व्हिडिओच्या सुरवातीला एक अपंग दहशतवादी दाखवला आहे. तो कारच्या जवळ जावून आत्मघातकी स्फोट घडवून आणतो.
- मोसुल शहराला दहशतवाद्यांच्या ताब्यातून सोडविण्यासाठी इराकच्या लष्कराने मोठी मोहिम हाती घेतली आहे. पण अद्याप यश आलेले नाही.
 
पुढील स्लाईडवर बघा, ISIS च्या दहशतवाद्यांनी युद्धबंदींना कसे हालहाल करुन मारले....    
बातम्या आणखी आहेत...