आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isis Killing Injured Fighters To Sell Organs For Cash Strapped

आपल्याच दहशतवाद्यांची इस्लामिक स्टेट करतेय हत्या; त्यांच्या ह्दय, यकृताची होते विक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्थिक संकटाना तोंड देत असलेल्या इस्लामिक स्टेटने (आयएसआयएस) मानवी अवयव विक्रीचा व्यवसाय सुरु केलाय. - Divya Marathi
आर्थिक संकटाना तोंड देत असलेल्या इस्लामिक स्टेटने (आयएसआयएस) मानवी अवयव विक्रीचा व्यवसाय सुरु केलाय.
कैरो - आर्थिक संकटाना तोंड देत असलेल्या इस्लामिक स्टेटने (आयएसआयएस) मानवी अवयव विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. आतापर्यंत ही दहशतवादी संघटना ओलिसांची हत्या करुन त्यांच्या शरीरातील अवयव विकत असे. आता यासाठी ती आपल्या जखमी दहशतवाद्यांना मारायला सुरुवात केली आहे. मानवी शरीरातील हे अवयव ते ब्लॅक मार्केटमध्‍ये मोठ्या किंमतीत विकत आहे. जखमी दहशतवाद्यांना मारुन त्यांचे ह्दय आणि यकृत काढले जात आहे...
- अरबी वृत्तपत्र अल-सबाहच्या वृत्तानुसार, आयएसआयएस डॉक्टरांना धमकी देत आहे, की जखमी दहशतवाद्यांचा जीव घेऊन त्यांच्या शरीरातील अवयव काढण्‍यात यावी. असे जर केले नाहीतर गंभीर परिणामास समोरे जावे लागेल.
- दक्षिण मोसूलचा भाग हातात गेल्यानंतर दहशतवाद्यांना आर्थ‍िक संकट वाढले आहे.
- यामुळे जखमी दहशतवाद्यांची हत्या करुन त्यांचे ह्दय, यकृत काळ्या बाजारात विकले जात आहे.
- मोसूलच्या तुरुंगातील कैद्यांना रक्तदानासाठी वि‍वश केले जात आहे.
युरोपीयन बंडखोरांना सुटीवर पाठवले
- सीरिया आणि इराकमध्‍ये खलिफाचे राज्य कायम करणा-या आयएसआयएसने आपले युरोपीयन बंडखोरांनी सुटी देऊन घरी पाठवले आहे.
- याने ब्रिटन आणि काही इतर युरोपियन देशांमधील दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढला आहे.
- प्रसारमाध्‍यमांनी लीक झालेल्या काही दस्तावेजांचा आधार घेत बुधवारी सांगितले, की हजारो आयएस समर्थकांना एक्झिट कार्ड दिले गेले आहे.
- यावर आयएसच्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या सह्या आहेत. यातील अनेकांनी 2013 आणि 2014 दरम्यान सुट्या मागीतल्या होत्या.
- यात कागदपत्रांमध्‍ये समर्थकांचे नाव, संघटनेतील त्यांचे काम, केव्हा प्रवेश केला, केव्हा सोडले, का सोडले, कोणत्या क्रॉसिंग पॉइंटवरुन जात आहे, यासारखी तपशील आहे.
आयएसने म्हटले, भारतात आताच भरती नको
- सीरियात आयएसच्या हस्तकांना भारतात आपला संपर्क काही काळासाठी बंद ठेवायला सांगण्‍यात आले आहे.
- सूत्रांच्या माहितीनुसार, आयएसआयएस भरती करुन घेणारा शाफी अरमार ऊर्फ युसूप अल हिंदीने हे आदेश दिले आहेत.
- जानेवारीत एनआयएने अनेक राज्यांमध्‍ये आयएस मॉड्यूलविरुध्‍द मोहिम चालवून 24 पेक्षा जास्त लोकांना अटक केली होती. यात अमीर नावाच्या ग्रूपचा सदस्य मुद्दबिर मुश्‍ताक शेखही सामील होता. त्याला मुंबईतून अटक करण्‍यात आली होती. एनआयएने मुंबई, केरळ, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्‍ये ही मोहिम चालवली होती.
- गुप्तचर अधिका-याने सांगितले, काही दिवसांपासून दिसते की विदेशातील आयएसचे समर्थक आणि नेटकरी भारतीय तरुणांमध्‍ये ऑनलाइन चॅटमध्‍ये घट झाली. हे सर्व त्या आदेशानंतर घडले असेल.
- याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी तरुणांशी संपर्क साधण्‍याचे सोडले आहे.
- समर्थकांना आयएसमध्‍ये सामील करुन घेण्‍यासाठी स्काइप, सिग्नल, ट्रिलियन सारखी सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांच्या माध्‍यमातून ब्रेन वॉश केले जाते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, युरोपवर आण्विक हल्ला करण्‍याचा कट रचत आहे आयएसआयएस