आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isis Killing Injured Fighters To Sell Organs For Cash Strapped

भारतातील तपास मोहिमेला घाबरली ISIS, समर्थकांना शांत राहण्‍याचा आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इस्लामिक स्टेटला (आयएसआयएस) भारतापासून चार हात दूर ठेवण्‍यासाठी राष्‍ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गेल्या महिन्यांपासून सुरु केलेल्या मोहिमेमुळे सीरियातील दहशतवादी चिंतातूर झाले आहेत. त्यांनी भारतातील आपल्या साथीदारांना काही काळ शांत राहायला सांगितले आहे. तसेच भरती आणि ऑनलाइन कारवाया कमी करण्‍याचे आदेश दिले आहे. एनआयएने 24 पेक्षा जास्त लोकांना पकडले होते...

- गुप्तचर संस्थांनुसार, हे आदेश आयएसआयएसचा शफी अरमार ऊर्फ युसूफ अल हिंदीने भारतातील त्यांच्या हस्तकांना दिला आहे.
- जानेवारीत एनआयएने अनेक राज्यांमध्‍ये आयएसच्या विरुध्‍द चालवलेल्या मोहिमेत 24 पेक्षा जास्त लोकांना अटक केली होती.
- यात अमीर नावाच्या ग्रूपचा सदस्य मुद्दबिर मुश्‍ताक शेखही सामील होता. शेख हा भारतातील आयएसचा प्रमुख असल्याचे सांगितले जाते.
- त्याला मुंबईतून अटक करण्‍यात आली होती. एनआयएने मुंबई, केरळ, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्‍ये ही मोहिम चालवली होती.
आयएस कशी करते भरती
- गुप्तचर संस्थांनुसार, आयएसचे दहशतवादी तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्‍यासाठी फेसबुक, ट्विटर, स्काइप, सिग्नल, ट्रिलियन सारखी सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर करतात. भरती करणारे त्यांना धर्माच्या नावाने भडकवतात.
- त्यांना कट्टरवादी होण्‍यासाठी आणि आयएसशी जोडण्‍यास सांगितले जाते. तसेच इतरांनाही सदस्य व्हायला सांगितले जाते.
कारवाया कमी झाल्या
- एका मीडिया रिपोर्टनुसार, गुप्तचर अधिका-याने सांगितले, काही दिवसांपासून दिसते की विदेशातील आयएसचे समर्थक आणि नेटसेव्ही भारतीय तरुणांमध्‍ये ऑनलाइन चॅटमध्‍ये घट झाली. हे सर्व त्या आदेशानंतर घडले असेल.
- याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी तरुणांशी संपर्क साधण्‍याचे सोडले आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, आपल्याच दहशतवाद्यांना आयएस का मारत आहे