आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्लामिक स्टेटकडे पासपोर्ट प्रिंटिंग मशीन असल्याचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेकडे सिरियाचे कोरे पासपोर्ट आणि प्रिंटिंग मशीन असण्याची शक्यता एका अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. एकदम खऱ्या वाटणाऱ्या या पासपोर्टच्या आधारे आयएस हस्तकांना अमेरिकेत पाठवण्याचीही शक्यता आहे.
अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा तपास संस्थेने गेल्या आठवड्यात यासंदर्भात अहवाल प्रसिद्ध केला. त्यात आयएसआयएसने दीर-ए-जोर शहरावर कब्जा केल्यानंतर सिरियाशी साधर्म्य असलेले पासपोर्ट छापू शकत असल्याचे म्हटले आहे. दीर-ए-जोर शहरात पासपोर्टचे कार्यालय असून तिथे मोठ्या प्रमाणात कोरे पासपोर्ट व प्रिंटिंग मशीन उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते. सिरियातील राका शहरात अन्य पासपोर्ट कार्यालये आहेत. हीच खरी सिरियाची राजधानी आहे. राका आणि दीर-ए-जोर आयएसच्या ताब्यात गेल्याच्या १७ महिन्यांमध्ये अमेरिकेत जाण्यासाठी येथील बनावट पासपोर्टचा वापर केलेला असू शकतो.
बातम्या आणखी आहेत...