आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS म्होरक्या अबू बकर अल बगदादी हवाई हल्ल्यात जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - इस्लामिक स्टेटचा (ISIS) म्होरक्या अबू बकर अल बगदादी पश्चिम इराकमध्ये गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिटीश वृत्तपत्र गार्डियनने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इराकमध्ये दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या एका सूत्राने गार्डियनला सांगितले की, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यामध्ये इस्लामिक स्टेटचा म्होरक्या जखमी झाला आहे. बगदादीची जखम जीवघेणी आहे. परंतु आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.