आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूरतेचा कळस गाठणारी ISIS दहशतवादी संघटना कशी तयार झाली, वाचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: नोव्हेंबर 2014 मध्‍ये बगदादी मारला गेल्याचे वृत्त अाल्यानंतर सोशल मीडियावर हे छायाचित्र व्हायरल झाले होते.
दहशतवादी संघटना आयएसआयएसचा प्रमुख अबु बक्र अल बगदादी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात जखमी झाल्याचे जगातील माध्‍यमात वृत्त झळकले आहे. मागील वर्षात नोव्हेंबर 2014 मध्‍ये तो मारला गेल्याचे वृत्त आले होते. परंतु तो जिवंत होता. बगदादी जखमी झाला, की नाही याबाबत शंका असताना आयएसआयएस जगातील दहशतवादाचा पर्याय बनला आहे. यानिमित्त divyamarathi.com तुम्हाला ही दहशतवादी संघटना कशा पध्‍दतीने हिंस्रक बनली याविषयी सांगणार आहे.

अबु मुसाब अल जरकावीला इस्लामिक स्टेट इन इराक अँड सीरिया (आयएसआयएस)चा संस्थापक मानले जाते. एका वृत्तानुसार 1989 मध्‍ये मुजाहिद्दीनमध्‍ये सहभागी होण्‍यासाठी पाकिस्तानमध्‍ये पोहोचला होता. तेव्हा सोव्हिएत सेनेने अफगाणिस्तान सोडले होते. जवळ-जवळ 11 वर्षानंतर जरकावी अफगाणिस्तानमधील हेरात शहरातील प्रशिक्षण शिबीर 'अल तौहीद वल-जिहाद' चा प्रमुख बनला. हे शिबीर पुढे चालून एका दहशतवादी गट म्हणून पुढे आला.
यानंतर तौहीद वल-जिहाद गटाने दहशत पसरवण्‍यास सुरु केले. 2003 मध्‍ये या गटाने बगदादमध्‍ये जॉर्डन दूतावासामध्‍ये बॉम्ब स्फोट घडवून आणले. हल्ल्यात अयातुल्ला मोहम्मद बकीर अल-हकीम यांचा जीव गेला. ते इराकमधील इस्लामिक क्रांतीचे सुप्रीम कौन्सिलचे नेते होते. आता जरकावीची महत्त्वाकांक्षा वाढीला लागली. त्याने 2006 मध्‍ये मुजाहिद्दीन अॅडवायझरी कौन्सिल ऑफ इराकची घोषणा केली. मात्र त्याच वर्षी 7 जून रोजी अमेरिकेच्या सैन्य कारवाईत तो मारला गेला. आता अॅडवायझरी कौन्सिलला नवा नेता हवा होता. जरकावी नंतर इजिप्तचा अबु अय्यूब अल-मसरी ऊर्फ अबु हमजा अल-मुजाह‍िर हा नवा नेता बनला.

अबु हमजाने खूप गतीने इराकमध्‍ये आपला दबदबा कायम केला. ऑक्टोबरमध्‍ये त्याने इराकमध्‍ये एक आंदोलनाला इस्लामिक स्टेट ऑफ इराक(ISI) असे नाव दिले. पुढे जाऊन इराकमध्‍ये राहणा-या अबु उमर अल-बगदादींच्या नेतृत्वाखाली वाढले. पुन्हा 2010 मध्‍ये एप्रिल महिन्यात दोघेही मारली गेली. या घटनेनंतर अबु बक्र अल-बगदादीला नवा नेता बनवण्‍यात आला.

बगदादी येताच आपल्या साम्राज्याला विस्तार सुरु केला. त्याने 2011 मध्‍ये रमदानच्या निमित्त अनेक कमांडरांना सीरियात संघटनेचा कार्यक्षेत्र वाढवण्‍यासाठी पाठवले. यानंतर डिसेंबर 2011 मध्‍ये सीरियन संघटना जब्हात अल-नुसरा ली अल्ह अल-शामशी करार करुन तिथे नवी शाखा सुरु केली. बगदादीला जेव्हा संघटना मजबूत झाल्याचा वाटले, तेव्हा त्याने 2013 मध्‍ये इस्लामिक स्टेट इन इराक अँड सीरिया अर्थात आयएसआयएसची घोषण केली. पुन्हा एका वर्षानंतर रमदानच्या पहिल्या दिवशी त्याने इस्लामिक स्टेट बनवण्‍याची घोषणा केली. गेल्या एक वर्षात या संघटनेने अनेक हिंस्रक हत्या केल्या. यात सामुहिक नरसंहारचाही समावेश आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, एका वर्षाच्या आत 7 हाय प्रोफाइल लोकांसह सामुहिक नरसंहार घडवून आणले...