रक्का - इस्लामिक स्टेटची महिला शरिया जज (शरिया कायदा लागू करणाऱ्या ISIS ची दहशतवादी) ने ISIS च्या एका दहशतवाद्याबरोबर लग्न करण्याच्या मोबदल्यात शीरच्छेद करण्याची परवानगी मागितली होती. ISIS चा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादीने लग्नाची भेट म्हणून या दहशतवादी महिलेला शीरच्छेद करण्याची परवानगी दिली. मात्र संघटनेच्या नियमांनुसार तिला एका महिलेचाच शीरच्छेद करता येणार आहे. ISIS च्या तावडीतून सुटलेल्या सिरियाच्या एका महिलेच्या हवाल्याने हा खुलासा करण्यात आला आहे.
ISIS च्या कैदेतून सुटलेल्या सिरियाच्या महिलेने केला खुलासा
ही दहशतावादी महिला रोआ उम खोताबा अल-तुनिसी असल्याचे समजले आहे. ISIS च्या तावडीतून सुटलेली सिरियाची महिला लीना (नाव बदललेले) ने सांगितले की, रोआ ही ट्युनिशियाची राहणारी असून तिच्या पतीचा एका हल्ल्यात मृत्यू झाला होता. रोआचे वय बरेच कमी आहे. त्यामुळे तिने पुन्हा विवाह करावा असे संघटनेचे मत होते. पण रोआ दुसऱ्या विवाहासाठी तयार नव्हती. पण तिने विवाहासाठी एक अट ठेवली होती. शीरच्छेद करण्याची परवानगी मिळेल तेव्हाच विवाह करण्यास तयार होईल अशी अट तिने ठेवली होती. तिला त्याची परवानगी देण्यात आली. आता ती हेरगिरीच्या आरोपातील एका दुसऱ्या महिला अन्य महिला शरिया जजचा शीरच्छेद करणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ISIS च्या कैदेतून बचावलेली सिरियाची महिला लीनाचे PHOTO