आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएसचे क्रौर्य : कारमध्ये बसवून रॉकेटने उडवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोसूल - दहशतवादी संघटना आयएसच्या क्रौर्याने सीमा ओलांडली आहे. अतिरेक्यांनी नुकतेच १६ जणांना खबरे ठरवत तीन वेगवेगळ्या पद्धतींनी ठार केले. या सर्वांना मारण्याआधी त्यांची मुलाखत घेण्यात आली. त्यात त्यांनी आयएसवर पाळत ठेवल्याचा आरोप मान्य केला. आयएसने चार जणांना कारमध्ये बंद करून रॉकेट लाँचरने उडवून देण्यात आले. अन्य एका पथकाने सात हेरांच्या गळ्याला स्फोटके बांधून उडवले. पाच जणांना पिंजर्‍यात बंद करून पाण्यात बुडवले. श्वास कोंडून मृत्यू येईपर्यंत त्यांना पाण्यात ठेवले. सात मिनिटांपर्यंतचा हा व्हिडिओ इराकच्या मोसूल शहरात तयार करण्यात आला. अतिरेक्यांनीच तो सोशल मीडियावर प्रसिद्ध केला.