आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामा म्हणाले- ...तर तुम्ही सुरक्षित राहाणार नाही, IS दहशतवादी ठग आणि चोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी पुन्हा एकदा इस्लामिक स्टेटला सज्जड दम भरला आहे. आयएसआयएसच्या दहशतवाद्यांना ठग आणि चोर संबोधत ते म्हणाले, 'तुम्ही एकाही अमेरिकन नागरिकावर किंवा अमेरिकेच्या मित्रावर हल्ला केला तर तुम्ही सुरक्षित राहू शकणार नाही.'

आता पर्यंत आयएसचे 120 कमांडर मारले
- ओबामांनी सांगितले, की आयएसआयएस सीरिया आणि इराकमधून आपले वर्चस्व गमावत चालला आहे. एवढेच नाही तर, त्यांच्या संघटनेत सहभागी होण्यासाठी विदेशातून येणाऱ्या तरुणांच्या संख्येत गेल्या दीड वर्षांमध्ये कमालीची घट झाली आहे.
- राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेसोबतच्या बैठकीनंतर ओबामा म्हणाले, 'गेल्या एक वर्षांत आयएसला सीरिया किंवा इराकमध्ये कोणतेही मोठे ऑपरेशन करता आलेले नाही.'
- आम्ही आतापर्यंत आयएसच्या 120 हून अधिक टॉप कमांडरला ठार मारले आहे. त्यासोबतच त्यांची आर्थिक रसदही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
- आम्ही त्यांच्या ऑइल इन्फ्रास्ट्रक्चर आणि पुरवठा यंत्रणेवर सतत हल्ले करत आहोत.
- मला वाटते की या हल्ल्यांमुळे ऑइलच्या माध्यमातून आयएसला मिळणारा कित्येक लाख डॉलरचा पुरवठा थांबला आहे.