आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅटेलाइट इमेजमध्ये दिसली ISISची क्रुरता, नरसंहाराने जमीन झाली लाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: ISISची क्रुरता दर्शवणारी सॅटेलाइट इमेज)
बगदाद- इराकमधील तिकरित मागील वर्षी दहशतवादी संघटना ISIS ने केलेला नरसंहार सॅटेलाइट कॅमेर्‍यानेही टिपला आहे. ISISच्या दहशतवाद्यांनी 12 जून 2014 ला इराक आर्मी बेस कॅम्प स्पेशरवर हल्ला केला होता. यात 770 जवानांसह एकूण 1500 निष्पाप लोकांची निर्घृण हत्या केली होती.
इराकचा दिवंगत हुकुमशहा सद्दाम हुसेन याचे होमटाऊन असलेल्या तिकरितची एक सॅटेलाइट इमेज समोर आली आहे. यात अनेक सामूहिक कब्री दिसत आहेत. यामुळे मरणांराची संख्या जास्त असू शकते, अशी शंका उपस्थित करण्यात आली आहे. दरम्यान, इराकी क्रिमिनल कोर्टाने या नरसंहारात सहभागी झालेल्या 24 दहशतवाद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.
काय म्हणतो 'ह्यूमन राइट्स वॉच'
ISIS नरसंहाराच्या सॅटेलाइट इमेजेसचे ह्युमन राइट्स वॉचने विश्लेषण केले आहे. सद्दाम हुसेन यांच्या 'वॉटर पॅलेस'पासून 100 मीटर अंतरावरील दोन ठिकाणी ISISने हजारों लोकांची हत्या केली आहे. मात्र, ISISच्या एका नव्या व्हिडिओ आणि सॅटेलाइट इमेजेसच्या विश्लेषणानंतर नरसंहाराचे तिसरे ठिकाण समोर येईल, असा दावा ह्युमन राइट्‍स वाचने केला आहे.
मृतदेह गायब, रक्ताने जमिनीचा रंग बदलला...
नरसंहाराचे दोन्ही ठिकाणे हे सलाद्दीन अल-अयूबी बिल्डिंगच्या उत्तरेला आहे. किमान 440 लोकांची हत्या झाल्याचा अंदाज आहे. 12- 13 जूनला सकाळी साडे नऊच्या सुमारास सगळ्यांवर गोळ्या घालण्यात आल्या होत्या. मात्र, 16 जूनच्या सॅटेलाइट इमेजेसमध्ये या ठिकाणी एक मृतदेह दिसत नसल्याचे ह्युमन राइट्‍स वॉचने म्हटले आहे. मात्र, या ठिकाणाच्या जमिनीचा रंग लाल दिसत आहे. जमिनीवर रक्ताचे निशाण दिसत आहेत. या ठिकाणी एक बुलडोझर देखील स्पष्ट दिसत आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह सामुहीक कब्रीत दफण केले जात असल्याचेही ISISच्या एग्जीक्युशन प्रोपेगॅंडा व्हिडिओमध्ये दिसत आहे.
दुसरे ठिकाण 24 ब्रिजजवळी 'वाटर पोलिस' बिल्डिंगमध्ये आहे. येथे 25 ते 30 जणांची सामुहिक हत्या केली होती. 12 जूनला सायंकाळी साडे सहा वाजता सगळ्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह तिगरिस नदीत फेकले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक पाहा, ह्युमन राइट्‍स वॉचने प्रकाशित केलेले फोटो...