कोण होता 'जिहादी जॉन'
- जिहादी जॉनची ओळख 27 वर्षांचा मोहम्मद एमवाजी अशी होती. तो ब्रिटनमध्ये राहणारा कुवेती वंशाचा ब्रिटिश नागरिक होता.
- ब्रिटिश उच्चारामुळे त्याची ओळख लगेच पटली होती. 2013 मध्ये इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्यासाठी सीरियात आले होते.
- दोन अमेरिकन पत्रकार जेम्स फोले(40), स्टीव्हन सोटलॉप (31) आणि दोन ब्रिटिश नागरिक डेविड हँस (44) आणि अॅलन हेनिंग(47)यांच्यासह सात ओलिसांचे शिरच्छेद त्यांना केला होता.
- सर्वप्रथम ऑगस्ट 2014 मध्ये त्याने अमेरिकन पत्रकार जेम्स फोलेचा शिरच्छेद केल्याचा व्हिडिओ प्रसिध्द केला होता.
कसा पोहोचला सीरियात 'जिहादी जॉन'?
ऑगस्ट 2009 : एमवाजी याने जिहादी जॉन आपल्या दोन मित्रांसह टांझानिया पोहोचला. मात्र त्याला दार ए सलाममध्ये प्रवेश मिळाला नाही. एमवाजी आणि त्याच्या मित्रांना अॅस्टरडॅमच्या विमानात बसवले गेले. येथे त्यांची चौकशी झाली. ते डोवरला परतले आणि येथे त्यांची विचारपूस करण्यात आली.
सप्टेंबर 2009 : ब्रिटनमधून कामासाठी कुवेतमध्ये गेला.
मे/जून 2010 : आठ दिवस ब्रिटनच्या दौ-यावर आला.
जुलै 2010 : एमवाजी पुन्हा एकदा ब्रिटनमध्ये आला. मात्र कुवेतला परताना हिथ्रो विमानतळावर त्याला पुन्हा थांबवले गेले. त्यास व्हिसाची मुदत संपल्याने प्रवासाला परवानगी नाकारली गेले.
2013 : एमवाजीने आपले नाव बदलून मोहम्मद अल अयान असे केले. पुन्हा कुवेतमध्ये जाण्यास प्रयत्न केला. मात्र पुन्हा त्याला रोखले गेले आणि त्याची चौकशीही करण्यात आली. तीन दिवसानंतर त्याने ब्रिटन सोडले. यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबाला तो सीरियात गेल्याची माहिती दिली.
पुढील स्लाइड्स जाणून घ्या केव्हा जिहादी जॉन आला जगासमोर...