आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिबियात आयएसच्या म्होरक्याचा खात्मा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्रिपोली - अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात लिबियात इस्लामिक स्टेटच्या म्होरक्याचा खात्मा झाला. अबू नाबिल असे ठार झालेल्या म्होरक्याचे नाव आहे. तो अल कायदाचादेखील सदस्य होता.
पेंटागॉनने हल्ल्याची माहिती जाहीर केली. त्यानुसार नाबिल हा आयएसच्या कारवायांच्या कटामागील मास्टरमाइंड होता. पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागेदेखील नाबिलचा हात होता. अमेरिकेने आता आपल्या कारवायांत वाढ केल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, सौदी अरेबियानेदेखील काही सिरियात हवाई कारवाई करून हल्ले केले होते. त्यात आयएसच्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता.