आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Member Publicly Executes Mother For Asking Him To Leave The Group

दहशतवाद सोड सांगणाऱ्या आईचीच हत्या; ISIS मध्ये सामील तरुणाचे कृत्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरूत- सिरिया-इराकसह जगभरात दहशतवादी कारवायांनी उच्छाद मांडलेल्या इस्लामिक स्टेट या संघटनेतील एका सदस्याने दहशतवाद सोडून देण्याचा सल्ला देणाऱ्या आईलाच जाहीरपणे गोळ्या घातल्याचे स्पष्ट झाले आहे. रक्कामध्ये राहणारी लीना अल कासिम आपला मुलगा अली सकर अल कासिम (२०) याला दहशतवादापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्नशील होती.

इसिसच्या नादी लागू नको म्हणून तिने अली सकर याला वारंवार सांगितले. मात्र, बेभान झालेल्या अलीने आईचे ऐकले तर नाहीच, उलट सर्वांसमक्ष अाईला गोळ्या घातल्या.
अली सकर याने आईवर धर्म सोडल्याचा आरोप केला होता. याबाबत इसिसच्या म्होरक्यांनाही त्याने माहिती दिली होती. यावर इस्लामिक स्टेटच्या म्होरक्यांनी सरळ आईला गोळ्या घाल, असा आदेश अली सकर यास दिला. हा आदेश पाळत त्याने लोकांसमोर आईला निर्दयपणे गोळ्या घातल्या. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील इसिसविरोधी आघाडी या संघटनेला संपवून टाकेल. त्यापूर्वी आपण रक्का शहर सोडून जाऊ, अशी आईची भावना होती. हा प्रकार इसिसला कळाल्यानंतर त्यांनी आईला ताब्यात घेतले आणि रक्का शहरात शेकडो लोकांसमोर आईला गोळ्या घालण्याचे आदेश तिच्या दहशतवादी पुत्राला दिले.

सिरियातील मानवी हक्क संघटनेच्या सदस्यांनी हा प्रकार जगासमोर आणला. इसिसने गेल्या १८ महिन्यांत दोन हजारहून अधिक सिरीयन नागरिकांची हत्या केल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे.