आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isis Militants Reportedly Burn Alive 45 People In Western Iraq

इस्लामिक स्टेटच्या क्रूरतेचा परमोच्च बिंदू, 45 लोकांना जाळले जिवंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दहशतवाद्यांनी इराकमध्‍ये 45 लोकांना जिवंत जाळून हत्या केली आहे.यात इराकच्या सैनिक जास्त होती. घटना अल-बगदादी शहरातील आहे. शहरावर नुकतेच आयएसने ताबा मिळवला आहे. विशेष म्हणजे या शहरापासून काही अंतरावर अमेरिकेच्या सैन्याचे ठिकाण आहे. या घटनेच्या काही दिवसांपूर्वी आयएस दहशतवाद्यांनी लीबियात 21 ख्रिश्‍चनांची हत्या केली होती.
जाळून हत्या करण्‍यात आलेले लोक कोण होते आणि त्यांना का लक्ष्‍य करण्‍यात आले याबाबत अद्यापही माहिती मिळालेली नाही, असे स्थानिक पोलिस प्रमुख कर्नल क‍ासिम अल-ओबैदी यांनी सांगितले. अल-बगदादीच्या काही घरांमध्‍ये आताही लोक अडकलेली आहेत.यात सैनिक आणि त्यांचा परिवार सहभागी आहे.
अमेरिकेच्या लष्‍करी ठिकाणावर 320 सैन्य
अल-बगदादीवरील दहशतवाद्यांच्या वर्चस्वाने जास्त नुकसान होणार नाही, असे शुक्रवारी(ता.13) अमेरिकेचे संरक्षण विभागाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले. या ठिकाणापासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर अमेरिकेच्या लष्‍करी तळावर 320 सैनिक आहेत.

पुढे पाहा इजिप्तमधील कॉप्टिक ख्रिश्‍चनांचे कुटूंबीय शोक करताना...