आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISISचे ट्रेनिंग सेंटर: नव्या दहशतवाद्यांना पिंजऱ्यात बंद करुन दिल्या जातात मरणयातना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी संघटना आयएसआयएस नव्या दहशतवाद्यांना अतिशय भयावह पद्धतीचे प्रशिक्षण देत आहे. हे ट्रेनिंग म्हणजे मरणयातनांपेक्षा कमी नाही. ही बाब संघटनेच्या प्रचारासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओतून समोर आली आहे. नव्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यासाठी भल्यामोठ्या लोखंडी पिंजऱ्यात त्यांना बंद केले जाते. मग त्यामध्ये एकमेकांना आपसात लढवले जाते. सात मिनिटांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इराकमधील आयएसआयएसच्या मुख्य तळावरील असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये ?
इराक आणि सीरिया मधील बहूतेक भूभागावर इस्लामिक स्टेटने कब्जा मिळवला असून ते प्रचारासाठी वेळोवेळी व्हिडिओ प्रसिद्ध करत असतात. नव्या व्हिडिओमध्ये नव्या दमाच्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये एका मोठ्या लोखंडी पिंजऱ्यात नव्याने दहशतवादी झालेल्या तरुणांना बंद करण्यात आले आहे. त्यांच्या जवळ एक शस्त्रधारी कमांडर उभा राहून त्यांना लढण्यास प्रोत्साहित करतो. चेहऱ्यावर मास्क चढवलेल्या तरुणांना प्रशिक्षक लढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शिकवतो.
परदेशातील तरुणांना आकर्षित करण्यासाठी व्हिडिओ
बंकिंगहम विद्यापीठाच्या संरक्षण आणि गुप्तचर अभ्यास केंद्राचे संचालक अँटनी ग्लीस यांच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ शूट करण्याचा उद्देश परदेशातील (विशेषतः ब्रिटन) तरुणांना आयएसआयएसकडे आकर्षित करण्याचा आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, आयएसआयएस ट्रेनिंग सेंटरचे फोटोज्
बातम्या आणखी आहेत...